Matru Din 2020 Messages: मातृदिन निमित्त मराठी शुभेच्छा, Wishes, Greetings, Images च्या माध्यमातून Facebook, WhatsApp वर शेअर करून आपल्या आईला द्या खास शुभेच्छा!
पिठोरी अमावास्येला वंशवृद्धीसाठी पूजा केली जाते. म्हणूनचं याला मातृ दिन असेही म्हणतात. ही अमावस्या मुलांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी साजरी करण्यात येते. या दिवशी सायंकाळी अंघोळ करून आठ कलश स्थापित केले जाता. त्यावर पूर्णपात्रे ठेवून ब्राह्मी, माहेश्वरी व इतर शक्तींची पूजा केली जाते. तांदुळाच्याराशीवर चौसष्ट योगिनींना आवाहन देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात. या मूर्तीला पिठाने तयार केलेल्या पदार्थांचाचं नैवेद्य दाखवण्यात येतो.
Matru Din Messages in Marathi: श्रावण अमावास्येलाचं पिठोरी अमावस्या म्हणतात. पिठोरी अमावास्येला वंशवृद्धीसाठी पूजा केली जाते. म्हणूनचं याला मातृ दिन असेही म्हणतात. ही अमावस्या मुलांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी साजरी करण्यात येते. या दिवशी सायंकाळी अंघोळ करून आठ कलश स्थापित केले जाता. त्यावर पूर्णपात्रे ठेवून ब्राह्मी, माहेश्वरी व इतर शक्तींची पूजा केली जाते. तांदुळाच्याराशीवर चौसष्ट योगिनींना आवाहन देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात. या मूर्तीला पिठाने तयार केलेल्या पदार्थांचाचं नैवेद्य दाखवण्यात येतो.
ज्या स्त्रियांची मुले अल्पायुषी ठरतात किंवा जीला अपत्यसुख लाभत नाही, अशा स्त्रिया पिठोरीचे व्रत ठेवतात. हे व्रत पूजाप्रधान असून चौसष्ठ योगिनी या त्याच्या देवता आहेत. या दिवशी आईचा आशिर्वाद घेऊन तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. मातृदिनानिमित्त आपल्या आईला खास शुभेच्छा देण्यासाठी खालील शुभेच्छापत्र तुम्हाला नक्की उपयोगात येतील.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! (हेही वाचा - Bail Pola 2020 Messages: बैल पोळा सणाच्या शुभेच्छा Wishes, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन चैतन्यमय वातावरणात साजरा करा हा उत्सव!)
आई तुझ्या चेहर्यावरील हास्य हे असेच राहू दे
आणि माझ्या जीवनाला असाच अर्थ येऊ दे
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
दु:खात हसवी, सुखात झुलवी, गाऊनी गोड अंगाई
जगात असे काहीही नाही, जशी माझी प्रिय आई
ठेच लागता माझ्या पायी, वेदना होती तिच्या ह्रदयी
तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ मला माझी “आई”
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
कोठेही न मागता, भरभरून मिळालेलं दान
म्हणजे आई ...
विधात्याच्या कृपेचं निर्भेळ वरदान
म्हणजे आई...
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
‘देव’ प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही
म्हणून त्याने तूला निर्माण केलंय आई.
आई तू म्हणजेच ‘आत्मारूपी ईश्वर’ आणि
वात्सल्याची जननी आहे.
तूझ्यासारखं प्रेम कोणीच देऊ शकत नाही म्हणून
मातृदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा आई.!!!’
आई, हजार जन्म घेतले तरी
एका जन्माचे ऋण फिटणार नाही
आई, लाख चुका होतील मज कडून
तुझं समजवणं मिटणार नाही
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
भारतीय संस्कृतीत आईला फार महत्व आहे. आई ही केवळ मुलांचीचं नव्हे तर त्यांच्या संस्कारांची जननी समजली जाते. आई या दोन अक्षरी छोटयाशा शब्दात विश्वाला गवसणी घालण्याचे अतूट सामर्थ्य आहे. वात्सल्य वं त्यागाची मूर्ती म्हणजे आई होय. अशी ही आई एखाद्या देवतेपेक्षा कमी नाही. म्हणूनचं तिला आदराने ‘माऊली’ असेही म्हटले जाते.