IPL Auction 2025 Live

Margashirsha Guruvar Vrat 2022 Dates: 24 नोव्हेंबर पासून यंदा मार्गशीर्ष महिन्याची सुरूवात; पहा महालक्ष्मी व्रताच्या तारखा!

22 डिसेंबरच्या रात्री अमावस्या 7 वाजून 14 मिनिटांनी सुरू होणार असून समाप्ती 23 डिसेंबर दिवशी दुपारी 3 वाजून 47 मिनिटांची आहे.

Margashirsha Guruvar Vrat | Photo credits File Images

दिवाळी सरली की काही दिवसांतच मार्गशीर्ष (Margashirsha) महिना येतो. पवित्र हिंदू धर्मीय महिन्यांपैकी एक मार्गशीर्ष हा महिना असतो. या महिन्यात दर गुरूवारी महालक्ष्मीचं व्रत (Margashirsha Guruvar Vrat) करण्याची पद्धत असते. यंदा मार्गशीर्ष महिन्याची सुरूवात 24 नोव्हेंबर 2022 पासून होणार आहे. आणि यंदा मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाच दिवस हा गुरूवार आहे. त्यामुळे या व्रताची सुरूवात मोठ्या आनंदात होणार आहे. मार्गशीर्ष महिन्यातील सारे गुरूवार महालक्ष्मी व्रतासाठी (Mahalaxmi Vrat) पाळले जातात. यानिमित्त घरात घट मांडणीची रीत आहे. सकाळ संध्याकाळ महालक्ष्मीची पूजा केली जाते. तसेच शेवटचा मार्गशीर्ष गुरूवार हा खास अंदाजात, हळदी कुंकू समारंभाने साजरा केला जातो. मग यंदा तुम्ही देखील मार्गशीर्ष गुरूवात व्रत पाळणार असाल तर पहा या व्रताच्या नेमक्या तारखा कोणत्या? या निमित्ताने घरात काय केले जाते?

मार्गशीर्ष गुरूवार 2022 व्रत तारखा

पहिला गुरूवार - 24 नोव्हेंबर

दुसरा गुरूवार - 1 डिसेंबर

तिसरा गुरूवार - 8 डिसेंबर

चौथा गुरूवार - 15 डिसेंबर

पाचवा गुरूवार - 22 डिसेंबर

यंदा मार्गशीर्ष महिन्यात 5 गुरूवारचं व्रत साजरं केले जाणार आहे. 22 डिसेंबरच्या रात्री अमावस्या 7 वाजून 14 मिनिटांनी सुरू होणार असून समाप्ती 23 डिसेंबर दिवशी दुपारी 3 वाजून 47 मिनिटांची आहे. हे देखील वाचा: Margashirsha Guruvar Vrat: मार्गशीर्ष गुरुवार व्रत पूजा विधी, नियम व वैभवलक्ष्मी घट मांडणी कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती .

मार्गशीर्ष गुरूवारी महिला स्नान करून सकाळी महालक्ष्मी व्रतासाठी घटाची मांडणी करतात. पाच पानं आणि नारळाने घट बनवला जातो. त्याचा साजशृंगार केला जातो. या घटासमोर महालक्ष्मीचा मुखवटा लावण्याची किंवा फ्रेम ठेवण्याची पद्धत आहे. त्यानंतर सकाळ संध्याकाळ पूजा करून, महालक्ष्मी व्रताची कहाणी वाचून नैवेद्य दाखवला जातो. यानिमित्ताने महिला दिवसभर उपवास देखील करतात. Margashirsha Guruvar 2022 Wishes In Marathi: मार्गशीर्ष मासारंभ आणि गुरूवार व्रताच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळे Messages, WhatsApp Status! 

शेवटच्या गुरूवारी लक्ष्मीच्या रूपात जवळच्या, नात्यातल्या सवाष्ण महिला, कुमारिका यांना बोलावून हळदी कुंकू, मसाले दूध दिले जाते.