Marathi Patrakar Din 2024 Messages: मराठी पत्रकार दिनानिमित्त खास WhatsApp Status, Greetings, Wishes शेअर करत द्या शुभेच्छा
दर्पण वृत्तपत्रासोबत मराठीतले पहिले मासिक 'दिग्दर्शन' त्यांनी 1840 साली सुरू केले.
Marathi Patrakar Din 2024 Messages: महाराष्ट्रामध्ये मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन, म्हणजेच 6 जानेवारी हा दिवस ‘मराठी पत्रकार दिन’ (Marathi Patrakar Din 2024) म्हणून साजरा केला जातो. यंदा येत्या शनिवारी हा दिवस राज्यभर साजरा होणार आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी मुंबई येथे 6 जानेवारी 1832 रोजी ‘दर्पण’ या इंग्रजी आणि मराठी भाषेतील पाक्षिकाची सुरूवात करून मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली. पाश्चात्य विद्या व शिक्षण आत्मसात करून ‘दर्पण’च्या माध्यमातून बाळशास्त्री जांभेकरांनी समाजात नवी जीवनमूल्ये रूजविली. त्यांच्या या कार्याची आठवण म्हणून 6 जानेवारी रोजी राज्यात ‘मराठी पत्रकार दिन’ साजरा केला जातो.
बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांचा जन्म 6 जानेवारी 1812 रोजी पोंभुर्ले येथे झाला. मुंबईमध्ये त्यांनी सदाशिव काशीनाथ ऊर्फ ‘बापू छत्रे’ आणि बापूशास्त्री शुक्ल यांच्याकडे अनुक्रमे इंग्रजी व संस्कृतचे शिक्षण घेतले. त्याचसोबत गणित आणि शास्त्र या विषयांत त्यांनी प्रावीण्य मिळविले. समाज प्रबोधनासाठी त्यांनी सहयोगी गोविंद विठ्ठल कुंटे उर्फ भाऊ महाजनांच्या मदतीने ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले. (हेही वाचा: Makar Sankranti 2024 Bornahan: बाळाचं बोरन्हाण कसं करतात? जाणून घ्या यंदाच्या तारखा आणि बोरन्हाण करण्याची पद्धत!)
तर या पत्रकारदिनानिमित्त खास WhatsApp Status, Greetings, Messages, Wishes शेअर करत शुभेच्छा देऊ शकता.
दरम्यान, बाळशास्त्रींना मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलुगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन व ग्रीक या दहा भाषांचे ज्ञान होते. दर्पण वृत्तपत्रासोबत मराठीतले पहिले मासिक 'दिग्दर्शन' त्यांनी 1840 साली सुरू केले. 'दिग्दर्शन'मधून ते भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, पदार्थ विज्ञान, निसर्ग विज्ञान, व्याकरण, गणित तसेच भूगोल व इतिहास याविषयांवरील लेख व नकाशे आकृत्यांसह प्रकाशित करत. तर मराठी पत्रकारितेला निर्भिड, निष्पक्ष, लोकाभिमुखतेचा वारसा देणाऱ्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याला वंदन.