Marathi Bhasha Din 2021: 'या' कारणामुळे कवी कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त साजरा केला जातो मराठी राजभाषा दिन!
वा. शिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी रोजी ज्न्मदिवस. यांच्या जयंती निमित्त मराठी भाषा दिन साजरा केला जातो.
Marathi Rajbhasha Diwas 2021: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी रोजी ज्न्मदिवस. यांच्या जयंती निमित्त 'मराठी भाषा दिन' (Marathi Bhasha Din) साजरा केला जातो. कुसुमाग्रजांना साहित्य विश्वातला मानाचा 'ज्ञानपीठ पुरस्कार' प्राप्त झाल्यानंतर त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यामुळेच मराठी भाषेचं ज्ञान आणि सौंदर्य पुढील पीढीपर्यंत पोहचण्यास मदत होईल.
देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा आणि संस्कृती भरभराटीला आली. संस्कृत भाषेच्या प्रभावाखाली प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री बोलीभाषेतून मराठी भाषेचा उगम झाला, असे मानले जाते. शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि पेशव्यांच्या काळात या साम्राज्याचा विस्तार झाला. त्यानंतर मराठी भाषेला राजाश्रय मिळाला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मराठीला अधिकृत भाषेचा दर्जा प्राप्त झाला. 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि मराठीला राज्यभाषेचा मान मिळाला. (मराठी आहात? मग तुम्हाला या गोष्टी माहिती असायलाच हव्यात!)
सध्याच्या परदेशी भाषांच्या प्रभावात मराठी भाषा टिकवणं आव्हानात्मक झालं आहे. मात्र विविध उपक्रम, कार्यक्रमातून मराठी भाषेची गोडी पुढील पीढीपर्यंत पोहचवता येईल. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करणं आवश्यक आहे. मराठी साहित्याचे वाचन करणे, मराठी नाटकं, सिनेमे यांसारख्या कलाकृती याला भरभरुन प्रतिसाद देणे गरजेचे आहे. (मराठी भाषेचं सौंदर्य अधिक खुलवतात महाराष्ट्रातील या '14' मजेशीर बोली भाषा)
'किनारा', 'मराठी माती', 'वादळवेल', 'विशाखा' हे त्यांचे काव्यसंग्रह तर 'दुसरा पेशवा', 'वीज म्हणाली धरतील', 'नटसम्राट', 'राजमुकूट' इत्यादी त्यांची गाजलेली नाटकं आहेत. 'वैष्णव', 'जान्हवी', 'कल्पनेच्या तीरावर' या त्यांच्या काही खास कांदबऱ्या आहेत.