Makar Sankranti 2021: मकर संक्रांतीच्या दिवशी 'या' गोष्टी दान केल्यास होईल देवाची कृपा; वाचा सविस्तर

शिव पुराणानुसार, या दिवशी नवीन वस्त्रे दान करावीत. तसेच, तिळ किंवा गूळाचे दानही या दिवशी महत्त्वपूर्ण मानले जाते.

Makar Sankranti 2021 (PC - File Image)

Makar Sankranti 2021: मकर संक्रांतीचा सण दरवर्षी 14 जानेवारी रोजी साजरा केला जातो. याला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. पौराणिक मान्यतांनुसार, नवीन हंगामाचे आगमन या दिवसापासून होते. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. या दिवशी मकर संक्राती साजरी करण्यात येते. या दिवशी दान व धर्माचे विशेष महत्त्व आहे. असे मानलं जातं की, या दिवशी दान केले तर त्या व्यक्तीला पुण्य प्राप्ती होते. (वाचा- Makar Sankranti 2021: मकर संक्राती कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्त्व आणि पूजाविधी)

मकर संक्रांतीच्या दिवशी गरजूंना दान कराः

या दिवशी गरजूंना दान करणे शुभ मानले जाते. धर्मग्रंथानुसार, गरजू व्यक्तीला या दिवशी दान केल्याने पुण्य मिळते. त्यामुळे या दिवशी चांगल्या मनाने दान करणे आवश्यक आहे. या दिवशी अगदी मनापासून दान केले पाहिजे. (वाचा - Makar Sankranti 2021 Special Recipes: यंदा मकर संक्रांतीला घरी बनवा तिळाच्या लाडूसह तिळपापडी, तिळवडी सारख्या झटपट रेसिपीज, Watch Videos)

या गोष्टी करु शकतात दान :

मकर संक्रांतीच्या दिवशी एखादी व्यक्ती मीठ, तूप आणि धान्य दान करू शकते. शिव पुराणानुसार, या दिवशी नवीन वस्त्रे दान करावीत. तसेच, तिळ किंवा गूळाचे दानही या दिवशी महत्त्वपूर्ण मानले जाते. (Makar Sankranti 2021 Tilgul Recipe: यंदा मकर संक्रांतीला घरीच बनवा तिळगुळ, जाणून घ्या कसे बनवतात रंगेबीरंगी हलवा )

या गोष्टी दान करू नका :

लक्षात ठेवा की आपण मकर संक्रातीच्या दिवशी दान करत ​​असाल तर आपले ध्येय मोठ्यापणा दाखवणे किंवा कीर्ति मिळवणे हे असू नये. आपण जे दान करता ते जुने आणि निरुपयोगी नसावे.

टीप - या लेखातील कोणतीही माहिती / सामग्री / अचूकता किंवा विश्वसनीयता याची हमी देत नाही. ही माहिती आपल्याला विविध माध्यमांद्वारे / ज्योतिषी / पंचांग / प्रवचन / विश्वास / शास्त्रवचनांकडून संकलित करुन देण्यात आली आहे. आमचा हेतू फक्त ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचविणे हा आहे. वापरकर्त्यांनी त्यास केवळ माहिती म्हणून विचारात घ्यावे. यास सल्ला समजू नये.