Mahakavi Kalidas Din: कालिदास दिन कधी आणि का साजरा केला जातो?
आषाढ शुक्ल प्रतिपदा या दिवशी कालिदास यांचा जन्मदिन असतो त्यामुळे हा दिवस महाकवी कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो.
Kalidas Jayanti 2019: आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा कालिदास दिन ( Kalidas Din) म्हणून साजरा केला जातो.यंदा हा दिवस 3 जुलै 2019 दिवशी साजरा केला जाणर आहे. आषाढ शुक्ल प्रतिपदा या दिवशी कालिदास यांचा जन्मदिन असतो त्यामुळे हा दिवस महाकवी कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. कालिदास हे संस्कृत कवी आणि रचनाकार,नाटककार होते. 'उपमा' या अलंकाराचा वैशिष्ट्यपूर्ण वापर करून कालिदासांनी मानव आणि निसर्ग यांच्या संबंधांवर अनेक अजरामर रचना केल्या आहेत.
कालिदासांच्या रघुवंश, मेघदूत, कुमारसंभव, अभिज्ञानशाकुंतलम्, ऋतुसंहार या रचना विशेष गाजल्या. कालिदास यांच्या काल निश्चितीबाबत अभ्यासकांच्यामध्ये मतभेद आहेत.
जीवनाची काही रहस्य सांगणारी काही कालिदास रचित सुभाषितं
कालिदास यांनी रचनांमधून मानवी जीवनाची काही कटू सत्य देखील सांगितली आहेत.
पापशंकी अतिस्नेह:।
म्हणजे मानवी मन अति स्नेहात असणार्या व्यक्तीबाबत अनिष्टाची शंका घेते.
परदु:ख शीतलम।
एखाद्या दु:खाची दाहकता आपण स्वतः अनुभवलयाशिवाय समजत नाही.
मरणं प्रकृतिः शरीरिणां
मृत्यू हा अटळ आहे. तो समोर दिसत असेल तर त्याला स्वीकारायला आपण घाबरतो.
कालिदास या साहित्यकाराच्या स्मरणार्थ आता मध्य प्रदेशामध्ये या क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्या व्यक्तीला विशेष पुरस्काराने गौरवले जाते.