Lokmanya Bal Gangadhar Tilak Jaynati HD Images: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती निमित्त Wishes, WhatsApp Status, Photos शेअर करून करा अभिवादन

म्हणूनच त्यांच्या जयंती निमित्त इथे कही एचडी इमेजेस देत आहोत. ज्यात लोकमान्य टिळक यांचे विचार आहेत. या इमेजेस आपण Facebook Status, WhatsApp Status म्हणून ठेऊ शकता

Lokmanya Tilak Jayanti 2021 | File Image

Lokmanya Tilak Jaynati Wishes in Marathi: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज जयंती (Lokmanya Bal Gangadhar Tilak Birth Anniversary). 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे त्यांचा जन्म झाला. बालपणापासून बंडखोर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाळ गंगाधर टिळक (Lokmanya Bal Gangadhar Tilak) यांनी इंग्रजांविरुद्धच्या लढाईच्या पायाभरणीसाठी काम केले. ते स्वातंत्र्यपूर्व काळातील काँग्रेसचे मोठे पुढारी होते. याशिवाय प्रदीर्घ काळ त्यांनी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपदही भूषवले. लोकमान्य टिळक (Lokmanya Tilak) यांचे विचार आजही अनेकांना प्रेरणा देतात. म्हणूनच त्यांच्या जयंती निमित्त इथे कही एचडी इमेजेस देत आहोत. ज्यात लोकमान्य टिळक यांचे विचार आहेत. या इमेजेस आपण Facebook Status, WhatsApp Status म्हणून ठेऊ शकता.

लोकमान्य टिळक यांचे कार्य पाहून लोकांनी त्यांना लोकमान्य (Lokmanya)ही पदवी बहाल केली. लोकमानय टिळक (Lokmanya Bal Gangadhar Tilak) हे थोर राजकारणी, समाजिक कार्यकर्ते, लोकनेते होते. तसेच ते आधुनिक भाष्यकार व प्राच्यविद्या पंडितही होते. त्यांनी केसरी हे वृत्तपत्र सुरु केले. या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी ब्रिटीशांविरोधात लोखणी चालवली. केसरीतील एका लेखामध्ये तर त्यांनी 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे का' असा अग्रलेख लिहीला. या लेखावरुन संतप्त झालेल्या ब्रिटिशांनी त्यांना मंडाले येथील तुरुंगात पाठवले. तेथे त्यांनी गितारहस्य हा ग्रंथ लिहिला.

Lokmanya Tilak Jayanti 2021 Quotes | File Image
Lokmanya Tilak Jayanti 2021 Quotes | File Image
Lokmanya Tilak Jayanti 2021 Quotes | File Image
Lokmanya Tilak Jayanti 2021 Quotes | File Image
Lokmanya Tilak Jayanti 2021 Quotes | File Image

लोकमान्य टिळक यांनी बल्लाळ बाळ कुटुंबातील सत्यभामाबाई (माहेरचे नाव तापीबाई) यांच्याशी विवाह केला. त्या कोकणातील लाडघर गावच्या होत्या. लोकमान्य टिळक यांना तीन मुली आणि विश्वनाथ, रामभाऊ व श्रीधर असे तीन मुलगे होते. सध्या टिळक यांनी स्थापन केलेल्या केसरी हे वृत्तपत्र त्यांचे नातू ज.श्री.टिळक हे चालवतात. तेच वृत्तपत्राचे संपादक आहेत. ते राज्यसभेत खासदारही राहिले आहेत.