Karva Chauth Chand Time 2019: मुंबई, पुणे मध्ये आज करवा चौथ चांद किती वाजता दिसणार? पहा चंंद्रोदयाच्या वेळा
मग पहा आज करवा चौथचा चांद दिल्ली, मुंबई, पुणे शहरात नेमक्या किती वाजता दिसणार आहे?
करवा चौथ दिवशी भारतीय परंपरेनुसार, उपासकरी महिला दिवसभर निर्जळी उपवास करतात. हा उपवास सोडण्याकरिता चंद्राला चाळणीतून पाहून त्यानंतर पतीचा चेहरा पाहिला जातो. त्याच औक्षण केलं जातं. पती पत्नीला याच्या बदल्यात छानसं गिफ्ट देतो. तर पाणी आणि जेवणाचा घास भरवून तिचा उपवास मोडला जातो. मग या सार्यासाठी पहा तुमच्या शहरात नेमकी चंद्रोदयाची वेळ आहे. नक्की वाचा: Karwa Chauth 2019 Mehndi Designs: ‘करवा चौथ’च्या दिवशी काढा ‘या’ खास मेहंदी डिझाईन.
भारतातील प्रमुख शहरांमधील चंद्रोदयाची वेळ काय?
मुंबई चंद्रोदयाची वेळ
मुंबई मध्ये चंद्रोदय रात्री 8:48 वाजता होणार आहे.
पुणे चंद्रोदयाची वेळ
पुणे शहरात चंद्रोदय रात्री 8:44 वाजता होणार आहे.
दिल्ली चंद्रोदयाची वेळ
दिल्ली शहरात चंद्रोदय रात्री 8: 20 वाजता होणार आहे.
करवा चौथ दिवशी महिला सोळा श्रृंगार करून सजून नटून पतीसाठी सज्ज होतात. यादरम्यान त्या निर्जळी उपवास करतात. पतीच्या दीर्घायुष्यासाठी केलेल्या या करवा चौथच्या व्रतामध्ये महिल भगवान शंकर, पार्वती, गणपती आणि कार्तिकेयाची पूजा करतात. यंदा 70 वर्षांनंतर एक उत्तम संयोग जुळून आला आहे. यंदा चंद्र शुभ नक्षत्रावर उगवणार आहे.रोहिणी नक्षत्र आणि मंगळाचाही योग जुळून आल्याचा ज्योतिषशास्त्राचा दावा आहे.