Mehndi Designs (Photo Credits - Instagram )

गेल्या आठवड्यात नवरात्रीचा (Navratri) सण उत्साहात साजरा करण्यात आला. या सणानंतर आता विवाहित महिलांसाठीचे 'करवा चौथ' (Karwa Chauth) व्रत येत्या १७ ऑक्टोबरला साजरा होत आहे. यादिवशी मेहंदीचे (Mehndi Designs) विशेष महत्त्व असते. तुम्हालाही करवा चौथच्या दिवशी खास मेहंदी काढायची असेल तर 'हा' खास लेख तुमच्या नक्की उपयोगात येईल. दर वर्षी कार्तिक महिन्याच्या चौथ्या चतुर्थीस करवा चौथ व्रत साजरे केले जाते. भारतात मुख्यत्वे राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात, हरियाना, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब या राज्यांमध्ये महिला हे व्रत करतात.

भारतीय परंपरेनुसार, हिंदीभाषीय विवाहित महिला यादिवशी पहाटे स्नान करून शिव शंकराला व सूर्याला पाणी अर्पण करतात. त्यानंतर सकाळपासून ते रात्री चंद्रदर्शनापर्यंत उपाशी राहून आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी चंद्र देवतेस प्रार्थना करतात.

हेही  वाचा - Happy Karva Chauth 2019 Wishes: करवा चौथ च्या शुभेच्छा देण्यासाठी खास ग्रीटिंग्स, SMS, Messages, GIFs, Images, WhatsApp Status and Stickers!

यादिवशी महिला रात्री पिठाच्या चाळणीतून चंद्र दर्शन करून पतीच्या हातून पाणी पिवून हे व्रत पूर्ण करतात. यादिवशी महिला सुंदर असा श्रृंगार करतात. तसेच हातांवर आकर्षक मेहंदी काढतात. हरतालिकेच्या पुजेप्रमाणेच करवा चौथ व्रताच्या दिवशी सोळा श्रृंगाराला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे यादिवशी महिला हात आणि पायांवर मेहंदी काढत असतात. यावर्षी तुमचा करवा चौथ अधिक आकर्षक करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही खास मेहंदीच्या डिझाईन (Mehndi Designs) घेऊन आलो आहोत.

 

ठिपके आणि पानांची मेहंदी-

 

करवा चौथ स्पेशल  डिझाईन - 

सोपी आणि आकर्षक डिझाईन -

 

ठिपक्यांची सुंदर मेहंदी डिझाईन -

 

सोपी आणि कमी वेळेत काढता येईल अशी डिझाईन -

अरेबिक मेहंदी डिझाईन - 

 

View this post on Instagram

 

Arabic henna design!!!#hennaarabic #henna #hennatattoo #hennadesigns #mehendi #mehendidesign #mehndi

A post shared by Madiha's henna (@madiha_henna) on

पायावरील आकर्षक मेहंदी डिझाईन - 

या सर्व मेहंदी डिझाईन तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. करवा चौथच्या दिवशी या खास मेहंदी डिझाईनमुळे तुमच्या सौंदर्यात आणखी भर पडेल.