Kartiki Purnima 2024 Wishes: कार्तिक पौर्णिमेनिमित्त खास Messages, Wallpapers, WhatsApp Status, Images शेअर करून साजरा करा मंगलमय दिवस

या दिवशी गंगेत स्नान केल्याने वर्षभर गंगा स्नानाचे फळ मिळते. या दिवशी दिवे दान करणे आणि विशेषत: देवी लक्ष्मीची पूजा केल्याने शुभ परिणामांची प्राप्ती वाढते.

Kartiki Purnima 2024 Wishes (File Image)

Kartiki Purnima 2024 Wishes In Marathi: हिंदू धर्मात कार्तिक पौर्णिमेला (Kartiki Purnima 2024) विशेष महत्त्व आहे. एका वर्षात एकूण 12 पौर्णिमा तिथी असतात, ज्यामध्ये कार्तिक पौर्णिमेला विशेष स्थान असते. देव दिवाळी देखील दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला साजरी केली जाते. कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात.  या तिथीला भगवान शिवाने त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता, म्हणून ती त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. कार्तिक पौर्णिमेला पवित्र नदीत स्नान करून दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी दान केल्याने आणि नद्यांच्या काठावर दिवे लावल्याने अनेक पटींनी पुण्य प्राप्त होते.

पंचांगानुसार, कार्तिक पौर्णिमा तिथी 15 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 06:19 वाजता सुरू होत आहे आणि 16 नोव्हेंबर 2024 रोजी पहाटे 02:58 वाजता समाप्त होईल. उदयतिथीनुसार कार्तिक पौर्णिमेचा सण 15 नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे. शुक्रवार, 15 नोव्हेंबर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी, ब्रह्म मुहूर्त पहाटे 4:58 ते 5:51 पर्यंत आहे. कार्तिक महिन्यात गंगा स्नान आणि भगवान विष्णूची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे.

शास्त्रात कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गंगेत स्नान करण्याचे मोठे महत्त्व सांगितले आहे. या दिवशी गंगेत स्नान केल्याने वर्षभर गंगा स्नानाचे फळ मिळते. या दिवशी दिवे दान करणे आणि विशेषत: देवी लक्ष्मीची पूजा केल्याने शुभ परिणामांची प्राप्ती वाढते. भगवान विष्णूचा मत्स्य अवतार कार्तिक पौर्णिमेला झाला, मत्स्य अवतार हा भगवान विष्णूच्या दहा अवतारांपैकी पहिला  अवतार मानला जातो. कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी मंदिर आणि सार्वजनिक ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात येतो. अशा या मंगलदिनी खास Wallpapers, Wishes, WhatsApp Status, Messages, HD Images शेअर करून तुम्ही कार्तिकी पौर्णिमेच्या शुभेच्छा देऊ शकता.

Kartiki Purnima 2024 Wishes

Kartiki Purnima 2024 Wishes
Kartiki Purnima 2024 Wishes
Kartiki Purnima 2024 Wishes

(हेही वाचा: Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती तारीख, महत्त्व आणि जगभरातील उत्सव, घ्या जाणून)

दरम्यान, शीख धर्मात कार्तिक पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे, कारण या दिवशी गुरु नानक देवजी यांचा जन्म झाला होता. शीख धर्मात हा दिवस गुरु पर्व म्हणून साजरा केला जातो. कार्तिक पौर्णिमेला गुरुद्वारांमध्ये विशेष पूजा आणि लंगरचे आयोजन केले जाते. याशिवाय कार्तिक पौर्णिमेला पुष्कर या पवित्र नदीत ब्रह्मदेव अवतरले होते, अशीही एक धार्मिक मान्यता आहे. या कारणास्तव, दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला लाखो लोक पुष्कर नदीत स्नान करतात, पूजा करतात आणि दिवे दान करतात.