Jyotirao Phule Jayanti 2019: ज्योतिबा फुले यांच्या 192 व्या जयंती निमित्त जाणून त्याच्या योगदानाबददल खास गोष्टी
11 एप्रिल 1827 दिवशी जन्मलेल्या महात्मा ज्योतिबा फुले (Jyotirao Govindrao Phule) यांचे भारतीय समाजव्यवस्था सुधारणेमध्ये मोलाचे योगदान आहे.
Jyotirao Phule's 192nd Birth Anniversary: 11 एप्रिल 1827 दिवशी जन्मलेल्या महात्मा ज्योतिबा फुले (Jyotirao Govindrao Phule) यांचे भारतीय समाजव्यवस्था सुधारणेमध्ये मोलाचे योगदान आहे. शिक्षण, महिला आणि दलितांना समाजात स्थान, अनिष्ट रूढी आणि प्रथा यांच्याविरोधात लढणारे ज्योतिबा फुले (Birth Anniversary) यांची आज 192 वी जयंती आहे.
समाजसेवक ज्योतिबा फुले यांच्या आयुष्याबद्दल काही खास गोष्टी
- समाजसेवक ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचा अधिकार मुलांसोबतच महिला आणि मुलींनादेखील असल्याचे सांगत प्रथम त्यांची पत्नी सावित्रीबाई फुलेंना शिकण्यास प्रवृत्त केले.
- सावित्रीबाई फुले या पहिला महिला शिक्षिका ठरल्या, त्यांनी ज्योतिबा फुले यांच्यासह मुलींसाठी खास शाळा सुरू केली.
- शिक्षणासोबत जातीभेद, अस्पृश्यता यांच्याविरोधात लढा दिला. समजात समानता आणण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले.
- 11 मे 1888 साली ज्योतिबा फुले यांना विठ्ठलराव वांदेकर यांनी 'महात्मा' ही पदवी प्रदान केली.
- 1873 साली ज्योतिबा फुले यांनी समाजातील जातीभेद कमी करण्यासाठी आणि दलित व शुद्रांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सत्य शोधक समाजाची (Satya Shodhak Samaj) सुरूवात केली.
- उच्च वर्णीय आणि ब्रिटीश सरकार विरूद्ध आवाज उठवण्यासाठी ज्योतिबा फुले यांनी 16 पुस्तकं लिहली आहेत. 'गुलामगिरी' हे त्यांचं पुस्तक गुलामगिरी विरूद्धच्या आफ्रिकन अमेरिकन मोहिमेला अर्पण केले आहे.
आयुष्यभर रूढी आणि परंपरावादी समाजात विरोध पत्कारून अन्यायाला वाचा फोडणारे ज्योतिबा फुले यांनी आपळे सारे जीवन समाजसेवेला अर्पण केले होते. त्यांचा मृत्यू पुण्यामध्ये 28 नोव्हेंबर 1980 रोजी वयाच्या 63 व्या वर्षी झाला.