Lord Krishna Quotes: भगवतगीता द्वारा श्रीकृष्णाने केलेले हे '5' उपदेश बदलू शकतात तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन

गोकुळाष्टमीच्या रात्री भगवतगीतेच्या अध्यायांचे पठण केले जाते. तुमच्या आयुष्यातील देखील काही समस्यांचे निराकरण करण्यासाठी भगवतगीतेमध्ये श्रीकृष्णाने दिलेले हे उपदेश फायदेशीर ठरतात.

Krishna Quotes (File Image)

Life Changing Shri Krishna Quotes: भगवतगीता (Bhagavad Gita) हा हिंदू धर्मातील एक पवित्र ग्रंथ आहे. युद्धभूमीवर भगवान श्रीकृष्णांनी (Lord Shri Krishna) अर्जुनाला केलेला उपदेश, त्याच्या शंकांचं निरसन केलं. हे उपदेश आज 21व्या शतकातही मानवी आयुष्यातील अनेक प्रश्नांवर, समस्यांवर मार्गदर्शनपर आहेत. भगवत गीता हा मानवी जीवनासाठी मार्गदर्शनपर ग्रंथ मानला जातो. प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ मानला जात असल्याने त्याचे हिंदू धर्मियांच्या आयुष्यात खास स्थान आहे. कृष्णाने अर्जुनाला उद्देशून केलेले उपदेश आजही अनेक समस्यांना दूर करण्यासाठी मदतशीर ठरणारे आहे. Janmashtami 2019 Wishes: जन्माष्टमीच्या मराठी शुभेच्छा Greetings, WhatsApp Status, Messages, GIFs, Images च्या माध्यमातून देऊन साजरा करा यंदाचा कृष्ण जन्मोत्सव

आजकाल अनेक लहान लहान समस्यांचा बाऊ करून अनेकजण टोकाची पावलं उचलतात. पण जिथे प्रश्न, समस्या, अडचणी आहेत तेथे उत्तरंदेखील आहेत. फक्त ती योग्यरित्या आणि संयमाने ती उलगडण्याची गरज आहे. मग तुमच्या आयुष्यातील देखील काही समस्यांचे निराकरण करण्यासाठी भगवतगीतेमध्ये श्रीकृष्णाने दिलेले हे उपदेश फायदेशीर ठरतात ते पहा नक्की

श्रीकृष्णाचे उपदेश 

Krishna Quotes (Photo Credits: File Image)

भावार्थ- कर्म करणं हे मानवाच्या हाती आहे. ते निस्वार्थीपणे करावे. त्याच्या फळाची अपेक्षा करू नये. तसेच फळाची अपेक्षा न करता मी काम का करु? हा विचार देखील करू नये. म्हणजेच श्रीकृष्णाने मानवाला निस्वार्थीपणे काम करण्यास सांगितले आहे.

Krishna Quotes (Photo Credits: File Image)

भावार्थ- रागामुळे माणसाची मती भ्रष्ट होते तो मूर्ख होतो. मूर्ख माणसाच्य बुद्धीचाही काही उपयोग होत नाही. बुद्धीचाही नाश झाल्यानंतर आपोआपच मनुष्य स्वतःच्या नाशाला कारणीभूत ठरतो. त्यामुळे केवळ रागाच्या भरात हातातून सार्‍या गोष्टी गमावण्याआधीच रागावर नियंत्रण ठेवायला शिका म्हणजे विनाश टाळता येईल.

Krishna Quotes (Photo Credits: File Image)

भावार्थ -आत्मा अमर आहे. त्याला न शस्त्राने ठार करता येते, ना आगीने जाळू शकतो, पाण्याने न तो भिजू शकतो ना त्याला वार्‍याच्या झोक्याने सुकवता येते.

Krishna Quotes (Photo Credits: File Image)

भावार्थ -जेव्हा जेव्हा धर्माची हानी आणि अधर्माची वाढ होईल तेव्हा मी (श्रीकृष्ण) साकार रूप घेऊन प्रकट होईन.

Krishna Quotes (Photo Credits: File Image)

भावार्थ- युद्धात जर तुला वीरमरण आलं तर तू स्वर्गात जाशील, जर या युद्धात विजयी ठरलास तर धरतीवर हा विजय साजरा करू शकशील त्यामुळे अर्जुना उठ आणि निश्चयाने युद्धासाठी सज्ज हो. यामध्ये कृष्णाने प्रत्येकाला त्याच्या वर्तमानातील कर्मावर लक्ष्य केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे. कारण मानवासाठी वर्तमानातील कर्मापेक्षा श्रेयस्कार अजून काही असू शकत नाही असा सल्ला दिला आहे.

भगवान श्रीकृष्ण उपदेश

भगवतगीतेमध्ये 18 अध्याय आणि 700 श्लोकांचा समावेश आहे. गोकुळाष्टमीच्या रात्री भगवतगीतेच्या अध्यायांचे पठण केले जाते. शाळांमध्येही गोकुळाष्टमी आणि गोपाळकाल्याच्या सेलिब्रेशनचा एक भाग म्हणून भगवतगीता पठण केले जाते.