International Women's Day 2019 Google Doodle: 'महिला' शक्तीला सलाम करणारे गुगलचे खास 'महिला दिवस' विशेष डूडल!

जागतिक महिलादिवस 2019 च्या निमित्ताने 'Woman' हा शब्द जगातील विविध भाषांमध्ये, लिपीमध्ये गुगल डुडलमध्ये साकारला आहे.

International Women's Day 2019 Google Doodle (Photo Credits: Google)

Women's Day 2019: 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस (International Women's Day) म्हणून साजरा केला जातो. यंदा हे सेलिब्रेशन गुगल डुडलच्या (Google Doodle) माध्यमातूनही हटके अंदाजात करण्यात आले आहे. 'women empowering women' या थीमवर आधारित आजचं गुगल डुडल जगभरातील विविध महिलांनी साकारलं आहे.  'Woman' हा शब्द जगातील विविध भाषांमध्ये, लिपीमध्ये गुगल डुडलमध्ये  साकारला आहे. तर स्लाईड शो डूडलमध्ये (Slideshow Doodle) जगातील 13 विविध भाषांमधील प्रेऱणादायी महिलांच्या कोट्सचा (Women's Day quotes)  यामध्ये समावेश करण्यात आला आहे. जगभरात मागील काही वर्षांमध्ये, सध्या आणि भविष्यातही महिलांना प्रेरणादायी ठरतील अशा काही कोट्सचा समावेश करण्यात आला आहे. महिलांना प्रेऱणादायी ठरणारे हे कोट्स गुगल डुडलमध्ये डिझाईन करण्याचं काम देखील जगभरातील काही महिलांनी एकत्र येऊन केलं आहे.  International Women's Day 2019: 8 मार्चला का साजरा केला जातो जागतिक महिला दिन? कशी झाली सुरुवात?

सबिना कर्णिक (Sabeena Karnik) या मुंबईकर महिला कलाकाराची निवड गुगलने केली आहे. 'हम इतने अनमोल है की निराशा कभी  हमारे दिलो दिमाग मैं भी नही आनी चाहिए'  हा एक कोट तिने साकारला आहे. यासोबत दुबई, अमेरिका, जर्मनी, अर्जेंटिना, जपान अशा जगभरातील कलाकारांनी साकारलेली काही प्रेरणादायी कोट्स तुम्हाला गुगल डुडलच्या स्लाईड शोमध्ये दिसणार आहेत. Women's Day 2019 Theme Color: जागतिक महिला दिन सेलिब्रेशन मध्ये 'जांभाळ्या' रंगाचं महत्त्व काय?

Sabeena Karnik Design (Photo Credits: Google)

जागतिक स्तरावर महिलांच्या सक्षमीकरणासाठी साजरा केला जाणारा महिलादिवस यंदा Balance For Better या थीमवर आधारित आहे. अनेकदा महिलांचा विविध पातळ्यांवर झगडा सुरु असतो. अशावेळेस अनेक स्त्रिया तिचं हित दुय्यमस्थानी ठेवत आधी कुटुंबाचा विचार करते. पण आता काळ बदलला आहे. आता प्रत्येक स्त्रीला तिचा स्वतःचाही विचार करणं भाग आहे. कुटुंबाची जबाबदारी सांभाळत आपणही पुढे येऊ शकतो हे याआधीच अनेक स्त्रियांनी पटवून दिल आहे. आता त्याची प्रेरणा घेत प्रत्येकीला पुढे पाऊल टाकायचं आहे.

मग यंदा तुमचं वुमन्स डे सेलिब्रेशन कसं आहे? तुम्ही हा दिवस कसा साजरा करताय? हे आम्हांलाही नक्की सांगा.