Indira Gandhi Death Anniversary: इंदिरा गांधीजींच्या पुण्यतिथी निमित्त WhatsApp, Facebook द्वारा शेअर करा त्यांचे काही प्रेरणादायी विचार
31 ऑक्टोबर 1984 च्या दिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी 31 ऑक्टोबर दिवशी साजरी केली जाते. इंदिरा गांधीजींचा मृत्यू त्यांच्याच अंगरक्षकाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्याने झाला होता. 31 ऑक्टोबर 1984 च्या दिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देशात त्यानंतर अॅन्टी शीख दंगली उसळल्या होत्या. इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या आणि आतापर्यंतच्या एकमेव महिला पंतप्रधान आहेत. त्यांनी जानेवारी 1966 ते मार्च 1977 पर्यंत आणि पुन्हा जानेवारी 1980 ते 1984 साली त्यांच्या निधनापर्यंत पंतप्रधान पद भूषवलं आहे. आदराने त्यांचा उल्लेख भारताची पोलादी स्त्री असा देखील केला जातो. मग आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्याच काही प्रेरणादायी विचारांना पुन्हा उजाळा द्या.
इंदिरा गांधी या पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या एकुलत्या एक कन्या होत्या. फिरोज गांधी यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. पंडितजींच्या पावलावर पाऊल ठेवत इंदिराजींनी देखील राजकारणामध्ये आपला करिष्मा दाखवला आहे. Indira Gandhi Birth Anniversary: भारताच्या Iron Lady इंदिरा गांधींबद्दल काही खास गोष्टी!
इंदिरा गांधी यांचे विचार
पंडित नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान झाल्यानंतर इंदिरा गांधी यांनी त्यांची पर्सनल असिस्टंट म्हणून काम पाहिले होते. त्यांनी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष पदही भूषवलं होतं. 1964 साली नेहरूजींच्या निधनानंतर इंदिरा गांधी राज्यसभेच्या सदस्य झाल्या. लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी केंद्रीय प्रसारणमंत्री पद भूषवलं होतं. दोनदा पंतप्रधान पद भूषवलेल्या इंदिराजींच्या कार्यकाळात अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात ऑपरेशन ब्लू स्टार झाले आणि त्यामध्ये त्यांच्याच अंगरक्षकाने 31 गोळ्या त्यांच्यावर झाडत त्यांचा जीव घेतला.