Indian Navy Day 2024 HD Images: भारतीय 'नौदल दिना'निमित्त Wishes, Greetings, WhatsApp Status, Messages शेअर करून व्यक्त करा नौसेनेबद्दल अभिमान
भारतीय नौदलाच्या ध्वजात छत्रपती शिवाजी महाराजांचे बोधचिन्ह देखील समाविष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अशा वेळी नौदलाची निर्मिती केली, जेव्हा बहुतेक देशांकडे नौदलाच्या नावावर तुटपुंजी तुकडी होती. आता भारतीय नौदल हे जगातील सातवे सर्वात शक्तिशाली नौदल मानले जाते.
Indian Navy Day 2024 HD Images In Marathi: भारतीय नौदलासाठी (Indian Navy) 4 डिसेंबर ही तारीख खूप महत्वाची आह्रे. या दिवशी भारतीय नौदल दिन (Indian Navy Day 2024) साजरा केला जातो. हा दिवस भारतीय नौदलाच्या देशाप्रती असलेल्या सामर्थ्य, धैर्य आणि समर्पणाचे प्रतीक आहे. भारतीय नौदल दिन साजरा करण्याची परंपरा 1972 मध्ये सुरू झाली, जेव्हा वरिष्ठ नौदल अधिकाऱ्यांच्या परिषदेत 4 डिसेंबर रोजी साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतीय नौदल दिन 4 डिसेंबर रोजी साजरा करण्याचे कारण 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धाशी संबंधित आहे. या युद्धात पाकिस्तानने 3 डिसेंबरला भारतीय विमानतळावर हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर देत भारतीय नौदलाने 4 आणि 5 डिसेंबरच्या रात्री ‘ऑपरेशन ट्रायडंट’ राबवले.
या मोहिमेत भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या नौदलाचे मोठे नुकसान केले आणि शेकडो पाकिस्तानी नौदलाचे सैनिक मारले. या महान विजयाच्या स्मरणार्थ 4 डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. ईस्ट इंडिया कंपनीने 1612 मध्ये रॉयल इंडियन नेव्हीची निर्मिती केली, तेव्हा भारतीय नौदलाची स्थापना झाली. त्याचा उद्देश व्यापारी जहाजांचे संरक्षण करणे हा होता. स्वातंत्र्यानंतर, 1950 मध्ये त्याची भारतीय नौदल म्हणून पुनर्रचना करण्यात आली.
भारतीय नौदल दिन केवळ भारतीय नौदलाच्या कामगिरीची ओळखच देत नाही तर देशवासियांना त्यांच्या सैन्याबद्दल अभिमान वाटण्याची संधी देखील देतो. हा दिवस आपल्याला सागरी सुरक्षा आणि नौदलाची महत्त्वाची भूमिका समजून घेण्यास मदत करतो. तर या खास दिनाचे औचित्य साधत Wishes, Images, Greetings, WhatsApp Status, Messages शेअर करून द्या ‘भारतीय नौदल दिना’च्या शुभेच्छा.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांना ‘नौदलाचे जनक’ असेही म्हणतात. भारतीय नौदलाच्या ध्वजात छत्रपती शिवाजी महाराजांचे बोधचिन्ह देखील समाविष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अशा वेळी नौदलाची निर्मिती केली, जेव्हा बहुतेक देशांकडे नौदलाच्या नावावर तुटपुंजी तुकडी होती. आता भारतीय नौदल हे जगातील सातवे सर्वात शक्तिशाली नौदल मानले जाते. (हेही वाचा: When Is Mahaparinirvan Din 2024? कधी आहे महापरिनिर्वाण दिन? जाणून घ्या, संपूर्ण माहिती)
भारतीय नौदलाचे मुख्य कार्य म्हणजे समुद्रात सुरक्षा राखणे आणि आण्विक युद्ध रोखणे. यासह सागरी बचाव कार्यात मदत करणे, हे आहे. भारतीय नौदलाकडे अत्यंत शक्तिशाली आणि आधुनिक नौदलाचा समावेश आहे. यामध्ये आठ टँक लँडिंग जहाजे, 12 विनाशक, 12 फ्रिगेट्स, दोन आण्विक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आहेत. पाणबुड्यांमध्ये 16 हल्ला पाणबुड्या, 22 कॉर्वेट्स आणि आठ लँडिंग क्राफ्ट युटिलिटीजचा समावेश आहे. याशिवाय, भारतीय नौदलाकडे मोठ्या संख्येने सहायक जहाजे, लहान गस्ती नौका आणि इतर आवश्यक जहाजे आहेत, जी सागरी सुरक्षा आणि संरक्षण कार्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.