Indian Independence Day 2019: स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात प्रभावी भाषण कसे कराल?
परंतू, त्याशिवाय विविध कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते. अशा कार्यक्रमांतून भाषण करणे हे अनेकांसाठी मोठा आनंदाचा आणि आवडता कार्यक्रम असतो. त्यामुळे स्वातंत्र्याचे भाषण प्रभावी करण्यासाठी आपण या टीप्स नक्कीच ध्यानात घेऊ शकता.
Effective Speech For Independence Day in Marathi: स्वातंत्र्य दिनाचे भाषण प्रभावी कसे करावे? याचा जर तुम्ही विचार करत असाल तर, आम्ही आपल्याला काही टीप्स देऊ इच्छितो. पण, त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी माहिती असायलाच हव्यात. जसे की, 15 ऑगस्ट (15 August) या दिवशी पारतंत्र्याच्या बेड्या तोडण्यास आपल्याला यश आले. त्यामुळे जगाच्या नकाशावर अवतरला एक नवा देश भारत (India). 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. तेव्हापासून हा दिवस स्वातंत्र्य दिन (India Independence Day) म्हणून साजरा केला जातो. भारत यंदा आपला 73वा स्वातंत्र्य दिन (73rd Independence Day ) साजरा करत आहे. स्वातंत्र्य दिनी देशाचे पंतप्रधान राजधानी दिल्ली येथील लाल किल्ल्यावरुन आपला राष्ट्रध्वज फडकवतात. या कार्यक्रमात भारतीय सैन्य, संस्कृती यांचे प्रदर्शन केले जाते. ज्यामुळे देशवासीयांना आपल्या क्षमतेचा अभिमान वाटेल आणि शत्रूंना धडकी भरेन. स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात झेंडावंदनाचे कार्यक्रम होतात. परंतू, त्याशिवाय विविध कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते. अशा कार्यक्रमांतून भाषण करणे हे अनेकांसाठी मोठा आनंदाचा आणि आवडता कार्यक्रम असतो. त्यामुळे स्वातंत्र्याचे भाषण प्रभावी करण्यासाठी आपण या टीप्स नक्कीच ध्यानात घेऊ शकता.
स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात प्रभावी भाषणासाठी टीप्स
भारतमाता, स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवान यांना वंदन
आपल्या भाषणाची सुरुवातच भारतमाता, स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवान यांना वंदन करुन करा. या वेळी अगदी सर्वांची नावे घेणे शक्य नसले तरी, त्यांच्या कार्याचे तुम्ही केलेले स्मरण शब्दांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतील यची काळजी घ्या.
स्वातंत्र्यपूर्व भारताचा इतिहास (थोडक्यात)
भाषणाचे विविध प्रकार असतात. कार्यक्रमानुरुप त्याची लांबी, महत्त्व आणि भाषाशैली बदलते. त्यात स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम असेल तर, अनेक वक्त्यांना बोलायचे असू शकते. त्यामुळे आपल्या भाषणाची लांबी फारशी असू नये. अगदी थोडक्यात विविध मुद्दे कसे मांडता येतील हे पाहावे. जसे की, भाषणात स्वातंत्र्यपूर्व भाषणाचा उल्लेख करताना तो अगदी थोडक्यात असावा. कारण, स्वातंत्र्यपूर्व भारताचा इतिहास प्रचंड मोठा आहे. तो एका भाषणात संपणार नाही. तो सांगायला काही तास लागतील. त्यामुळे समयसीमेचे बंधन आपण पाळायला हवे. (हेही वाचा, Indian Independence Day 2019 Messages: स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा मराठमोळ्या ग्रिटिंग्स, SMS, Wishes, GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन साजरा करा यंदाचा इंडिपेंडन्स डे!)
स्वातंत्र्य चळवळ माहिती
आपल्या भाषणात स्वातंत्र्य चळवळीविषयी माहिती, घटना, प्रसंग यांचे उल्लेख जरुर असूद्यात. यात विविध नेत्यांनी केलेल्या पत्रसंवादाचे दाखले द्या. विविध सभांमधून, लेखांमधून, भाषणांमधून स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांनी केलेली विधाने, विचार हे त्यांच्याच नावाने सांगा. ते सांगताना संबंधित व्यक्तीने तो विचार, मुद्दा कधी, कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या निमित्ताने मांडला होता यावर भर द्या.
भारताच्या प्रगतीचा आलेख
आपल्या भाषणात भारताने केलेल्या प्रगतीचा आलेख जरुर सांगा. स्वातंत्र्यानंतर मधल्या काळात भारताने मोठी प्रगती केली आहे. मग ती प्रगती, विज्ञाना, शेती, तंत्रज्ञान, शिक्षण, लष्कर असो की इतर कोणत्याही क्षेत्रातील असो. या प्रकतीचा उल्लेख आवश्य करा. ज्यामुळे श्रोत्यांना स्वातंत्र्यपूर्व काळ, स्वातंत्र्य चळवळ आणि आपण केलेली प्रगती याची कमी वेळात, कमी शब्दात अधिक प्रमाणात मिळेल.
समारोप
कोणत्याही भाषणात समारोप महत्त्वाचा असतो. स्वातंत्र्य दिनाचे भाषण करतानाही तो महत्तवाचा. आपल्या भाषणात आपण, स्वातंत्र्यपूर्व भारत, भारताची स्वातंत्र्य चळवळ, भारताची प्रगती याबाबत माहिती दिलीत. आता भारताच्या प्रगतीत अडथळा ठरणाऱ्या सामाजिक, सांस्कृतीक, राजकीय आणि आर्थिक बाबींही थोडक्यात सांगा. भाषणाच्या अगदी शेवटच्या काही काळात भारतासमोरील संभाव्य आव्हानांचा वेध घ्या. आणि आपले भाषण थांबवा.