Independence Day 2019: स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा फडकवण्यापूर्वी 'हे' नियम लक्षात असू द्या!
तसेच स्वातंत्र्य दिनानिमित्त काही ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तर शाळा आणि महाविद्यालयात किंवा इमारतीच्या गच्चीवर तिरंगा फडकण्याचा सोहळा पार पडतो.
Happy Independence Day 2019: उद्या 15 ऑगस्ट असून देशभरात 73 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येणार आहे. तसेच स्वातंत्र्य दिनानिमित्त काही ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तर शाळा आणि महाविद्यालयात किंवा इमारतीच्या गच्चीवर तिरंगा फडकण्याचा सोहळा पार पडतो. मात्र तिरंगा फडकवण्याचे महत्व हे अनन्यसाधारण असून तो कशा पद्धतीने फडकवला जातो याचे सुद्धा काही नियम आहेत.
भारत देश ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. 150 वर्षे आपल्या देशातील लोकांनी या ब्रिटिशांच्या गुलामगिरीत काढली, अनेक हालअपेष्टा सहन केल्या. कित्येकांना फाशीची शिक्षाही झाली. तर कित्येकांना तुरुंगवासही भोगावा लागला. अशा शूर स्वातंत्र्यवीरांना, क्रांतिकारकांना, रणरागिनींना स्मरण्याचा त्यांना वंदन करण्याचा दिवस म्हणजे 15 ऑगस्ट. तर जाणून घ्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा फडकवण्यापूर्वी 'या' नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे.(73rd Indian Independence Day 2019: स्वातंत्र्यदिनानिमित्त जाणून घ्या भारताविषयी 5 अचंबित करणा-या गोष्टी)
-तिरंग्यावर कोणत्याही प्रकारचे लिखाण करण्यास सक्त मनाई आहे.
-फाटलेला तिरंगा कधीच झळकवू नये.
-दुखवट्याच्या वेळी तिरंगा अर्ध्यावर खाली उतरवावा.
-भारतीय नागरिक तिरंगा घरी, कारखान्यात, सार्वजनिक ठिकाणी फडकवू शकतो. मात्र सूर्यास्तापूर्वी तिरंगा उतरवला जाण्याचा नियम आहे.
-व्यासपीठावरुन झेंडा फडकवणार असल्यास व्यक्तीचा चेहरा श्रोत्यांच्या दिशेला असला पाहिजे. तसेच राष्ट्रध्वज डाव्या बाजूला असणे आवश्यक आहे.
-राष्ट्रीय ध्वजाचा वापर जातीय फायद्यासाठी घेऊ नये.
त्याचसोबत तिरंग्यातील तीन रंगाचे विशेष महत्व आहे. त्यामधील केशरी रंग हा शक्तीचे प्रतीक, पांढरा रंगा हा शांततेचे प्रतीकस हिरवा रंग हा हरितक्रांतीचे प्रतीक आणि तिरंग्यातील अशोकचक्र हे गति, उद्योग, विकास आणि विस्ताराचे प्रतीक असल्याचे मानले जाते. तसेच राष्ट्रध्वजाची लांबी रुंदी 2:3 प्रमाणात असावी.