Happy Tulsi Vivah 2019 HD Images: तुलसी विवाह शुभेच्छा निमित्त मराठी Greetings, Wallpapers, WhatsApp Stickers शेअर करुन साजरा करा कार्तिकी द्वादशीचा सण!

त्यामुळे या सोहळ्याच्या शुभेच्छा खास मराठमोळी HD Images, Greetings च्या माध्यमातून शेअर करून आनंद द्विगुणित करा.

Tulsi Vivah Images | File Image

Happy Tulsi Vivah 2019:  दिवाळीनंतर हिंदू  धर्मीयांना तुलसी विवाहाचे वेध लागतात. कार्तिकी एकादशीला चार महिने निद्रिस्त अवस्थेमध्ये असलेले भगावान विष्णू जागे झाल्यानंतर कार्तिकी द्वादशी ते कार्तिकी पौर्णिमा दरम्यान तुलसी विवाह सोहळा पार पडतो. पौराणिक कथेनुसार लक्ष्मीच्य रूपातील तुळस आणि विष्णुच्या रूपातील शाळीग्राम यांचा विवाह या काळात पार पडतो. आणि त्यानंतर शुभा कार्याची, लग्न  सोहळ्यांची सुरूवात होते. त्यामुळे या पवित्र आणि शुभ पर्वाच्या शुभेच्छा देण्यासाठी व्हॉट्स अ‍ॅप, फेसबूक स्टेटस, मेसेजेस, ग्रीटींग्सच्या माध्यमातून HD Images आणि Wallpapers शेअर करून तुलसी विवाहाच्या शुभेच्छा शेअर करा, तुलसी विवाहाचे फोटो सोशल मीडीयाच्या विविध  माध्यमातून शेअर करून कार्तिकी द्वादशीचा आनंद तुमच्या कुटुंबीयांसोबतच,आप्तेष्टांसोबत शेअर करून तुळशीच्या लग्नाचा बार दणक्यात उडवा. Tulsi Vivah 2019 Shubh Muhurat: कार्तिकी द्वादशी दिवशी तुळशी- शाळीग्रामच्या विवाहाचे सनई चौघडे वाजतील 'या' मुहूर्तावर.

आजकाल प्रत्यक्ष भेटून सारे सण  साजरे करणं शक्य नाही. त्यामुळे इंटरनेटच्या मदतीने जगाच्या एका टोकावर बसून दुसर्‍या टोकावर असलेल्या तुमच्या प्रियजनांना व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्स, इमेजेसच्या माध्यमातून शेअर करा आणि आजपासून सुरू झालेला हा तुलसी विवाहाचा सण साजरा करा.

तुलसी विवाहाच्या हार्दीक शुभेच्छा  

Tulsi Vivah Wishes | Photo Cedits: File Photo

Tulsi Vivah 2019 Wishes | File Photo
Tulsi Vivah Images | File Image
Tulsi Vivah 2019 Messages | File Photo
Tulsi Vivah 2019 Wishes | File Photo

तुलसी विवाह 2019 व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्स कशी डाऊनलोड कराल?

आज्काल जगभरात प्रामुख्याने व्हॉट्सअ‍ॅप हे मेसेजिंग अ‍ॅप वापरलं जातं. सणाच्या काळात शुभेच्छा, ग्रीटिंच्या माध्यमातून खास आकर्षक व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्सच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जातात. गूगल प्ले स्टोअरवर तुम्ही तुलसी विवाह 2019 व्हॉट्स अ‍ॅप स्टिकर्स सर्च करू शकता. व्हॉट्सअ‍ॅपने कस्टमाईज्ड इमेज स्टिकर्स बनवण्याची देखील सोय उपलब्ध करून दिली आहे.

विवाहीत स्त्रिया त्यांच्या वैवाहिक आयुष्याच्या सुख, शांतीची या दिवशी प्रार्थना करतात तर अविवाहीत मुली भविष्यात सुयोग्य पती मिळावा म्हणून उपवास ठेवतात. मान्यतेनुसार, तुलसी विवाह केल्याने कर्त्याला कन्यादानातून मिळणारे पुण्य मिळते. तसेच घरातील तरूणींना श्री कृष्णाप्रमाणे पती मिळावा यासाठी तुळशी विवाह साजरा केला जातो. त्यामुळे यंदा या सणाचं सेलिब्रेशन दणक्यात करा.