Happy Republic Day HD Images 2022: लोकशाहीचा उत्सव प्रजासत्ताक दिन साजरा करा HD Images, Wishes, Quotes, Greetings, WhatsApp, SMS, Facebook Message शेअर करुन

Happy Republic Day 2021: प्रतिवर्षी 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन (Happy Republic Day) म्हणून साजरा केला जातो. यंदाही भारत आपला 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाले तो दिवस 15 ऑगस्ट हा स्वतंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो.

Happy Republic Day HD Images 2022: लोकशाहीचा उत्सव प्रजासत्ताक दिन साजरा करा HD Images, Wishes, Quotes, Greetings, WhatsApp, SMS, Facebook Message शेअर करुन
Happy Republic Day HD Images

Happy Republic Day 2021: प्रतिवर्षी 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन (Happy Republic Day) म्हणून साजरा केला जातो. यंदाही भारत आपला 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाले तो दिवस 15 ऑगस्ट हा स्वतंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो. तर 26 जानेवारी 1950 रोजी भारताची स्वतंत्र राज्यघटना अस्तित्वात आली. त्यामुळे हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला गेला. या दिवशी खऱ्या अर्थाने भारत सार्वभौम झाला. त्यामुळे हा दिवसदेखील राष्ट्रीय सण म्हणूनच साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी Republic Day HD Images, Wishes, Quotes, Greetings, WhatsApp, SMS, Facebook Messages इथे देत आहोत.ज्या आपण अगदी मोफत डाऊनलोड करु शकता आणि शेअरही करु शकता.

प्रजासत्ताक दिन हा भारताच्या इतिहासातील अतिशय महत्त्वाचा दिवस आणि क्षणही आहे. कारण धर्म, भाषा, जात, प्रांत, प्रदेश यांबाबत कोणताही समानता नसलेला देश म्हणजे भारत. परंतू, असे असले तरीही विविधतेत एकता हे भारताचे वैशिष्ट्य आहे. (हेही वाचा, Republic Day 2022 Messages: प्रजासत्ताक दिनानिमित्त WhatsApp Status, Wishes, Images शेअर करून आपल्या मित्र-परिवाराला द्या खास शुभेच्छा!)

प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा भारताचे स्वातंत्र्य किती काळ टीकू शकेल याबाबत जगभरातील अनेकांनी साशंकता व्यक्त केली होती. त्यात भारतीय संविधानाने लोकशाही स्वीकारली. त्यामुळे शिक्षण, विज्ञान, आधुनिकता यांबाबत कोणतीच स्पष्टता नसलेला भारत लोकशाहीच्या मार्गाने टीकूच कसा शकेल यांवरच अनेकांना प्रश्नचिन्ह होते. असे असले तरी भारताने लोकशाही केवळ टीकवूनच नव्हे तर लोकशाही असलेला जगातील सर्वात मोठा देशही होऊन भारताने दाखवले आहे.त्यामुळे टीकाकारांचे तोंड भारताने कृतीतूनच बंदकेले आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन हे दोन अत्यंत महत्त्वाचे सण आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Jan 26, 2022 07:01 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).