Happy Kiss Day 2019: 'XOXO' यामध्ये 'घट्ट मिठी' आणि 'किस' यांचं कनेक्शन नेमकं कुठून आलं?

सर्वत्र व्हेलेंटाईन वीकची (Valentine Week 2019) धूम आणि सेलिब्रेशन सुरू आहे. यामध्ये 12 फेब्रुवारी हग डे (Hug Day) आणि 13 फेब्रुवारी हा किस डे (Kiss Day) म्हणून साजरा केला जातो.

XOXO (Photo Credits: Instagram)

Valentine’s Day 2019:  आजकाल शॉर्टफॉर्ममध्येच मनातच्या सार्‍या भावना बोलल्या जातात. भाषातज्ञांना 21 व्या शतकामध्ये झपाट्याने लोकप्रिय होत असलेल्या या भाषेमुळे मूळ भाषा कालबाह्य होईल अशी भीती आहे. लहान लहान गोष्टींपासून ते अगदी प्रेमाची भाषा आणि काही रोमॅन्टीक भावनादेखील या नव्या लिपित लिहल्या जातात. सध्या सर्वत्र व्हेलेंटाईन वीकची (Valentine Week 2019) धूम आणि सेलिब्रेशन सुरू आहे. यामध्ये 12 फेब्रुवारी हग डे (Hug Day) आणि 13 फेब्रुवारी हा किस डे (Kiss Day) म्हणून साजरा केला जातो. आजची पिढी हमखास त्यांच्या प्रिय व्यक्तीला प्रेमाची मिठी आणि किस या दोन्ही भावना XOXO अशा स्वरूपात पाठवल्या जातात. पण तुम्हांला ठाऊक आहे का XOXO आणि मिठी, किस यांचा एकमेकांशी काय संबंध आहे.

XOXO म्हणजे नेमकं काय?

semiotics and linguistic anthropology या विषयाचे University of Toronto चे आणि The History of the Kiss या पुस्तकाचे लेखक Marcel Denasi यांच्या मते, XO या शब्दांचा किस आणि मिठी या भवानांशी थेट संबंधांबद्दल कोणती माहिती नाही.

X म्हणजे किस

सामान्यपणे, X हे अक्षर Christ चं प्रतिक आहे. हळूहळू पाश्चात्य संस्कृतीमध्ये कल्चरल शिफ्ट झाला. पूर्वी महिलांना लग्न झाले म्हणजे सर्व काही त्या व्यक्तीच्या आयुष्याला देऊन टाकावं असा होता. पण जसजसा काळ सरला तसे लग्नापूर्वी प्रेम करणं ही भावना आणि त्याचं महत्त्व पटलं. पूर्वी पत्र पाठवताना त्यावर X लिहून पाठवले जात असे. अशीही मान्यता आहे की, 'X' याकडे व्यवस्थित पाहिलं तर दोन व्यक्ती किस करत असल्यासारखं चित्रं दिसतं.

O म्हणजे घट्ट मिठी

tic-tac-toe म्हणजे आपला फुल्ली गोळ्याचा खेळही मध्यकालीन युगामध्ये आला. त्यामुळे X आणि O हे कनेक्शन खूप जुनं आहे. 1960 पूर्वीपासून मिठीसाठी O वापरल्याचे अनेक संकेत वॉशिंग्टन पोस्टमध्ये आढळतात. जर तुम्ही वर्तुळाच्या आतमध्ये गेलात तर तुम्हांला ते form of enveloping सारखं दिसतं. म्हणजेच तुम्ही कोणालातरी घट्ट मिठी मारत आहात. यामध्ये तुम्ही ऑरा आणि फिजिकली त्या व्यक्तीला आपल्या कवेत घेत आहात असा त्याचा अर्थ होतो. मिठी मारतानाही नकळत तुमच्याभोवती एक वर्तुळ बनत.Hug Day 2019: या '5' प्रकारच्या मिठी देण्याच्या अंदाजातून लाखो शब्दांशिवाय बरंच काही बोललं जातं, पहा प्रत्येक मिठीचा अर्थ काय?

काही सांस्कृतिक, प्राचीन गोष्टींचा भाषेवर परिणाम झाला आणि तो आज शॉर्ट फॉर्ममधील भाषेतही आला. आजकाल सर्रास प्रेमाची मिठी आणि किस यासाठी XOXO वापरतात.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now