Happy International Nurses Day 2021 Images: जागतिक परिचारिका दिनानिमित्त WhatsApp, SMS, Wishes, Facebook Greetings च्या माध्यमातून द्या शुभेच्छा!
तर फ्लोरेंस नाइटिंगेल यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण जगात हा दिवस आंतरराष्ट्रीय 'नर्स डे' साजरा करतात.
International Nurses Day 2021 Images: आज (12 मे) सर्वत्र जागतिक परिचारिका दिन साजरा केला जात आहे. तर फ्लोरेंस नाइटिंगेल यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण जगात हा दिवस आंतरराष्ट्रीय 'नर्स डे' साजरा करतात. तर समाजातील परिचारिकांकडून दिल्या जाणाऱ्या योगदानाच्या सम्मानासाठी आजचा दिवस खास आहे. 12 मे 1920 मध्ये जन्मलेल्या फ्लोरेंस नाइटिंगेल एक इंग्रजी समाज सुधारक आणि आधुनिक नर्सिंगच्या संस्थापक होत्या. नाइटिंगेल यांना क्रिमियन युद्धाच्या दरम्यान त्यांच्या द्वारे प्रशिक्षण दिलेल्या नर्सला प्रबंधकांच्या रुपात काम केल्याने त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांनी जखमी झालेल्या सैनिकांवर उपचार करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिले गेले होते. त्यांनी नर्सिंग प्रोफेशनला अत्याधिक अनुकूल प्रतिष्ठा दिली. रात्रीच्या वेळेस त्या लॅम्प घेऊन जखमी झालेल्या सैनिकांची सेवा करण्यासाठी जात असत. यासाठी त्यांना 'द लेडी विद द लॅम्प' च्या व्यक्तित्वच्या विक्टोरियन संस्कृतिच्या प्रतीक बनल्या.
इंटरनॅशनल काउंसिल ऑफ नर्स यांच्याकडून 1965 पासून हा दिवस साजरा केला जात आहे. परिचारिकांच्या समर्पण आणि काम याचे आभार आजच्या दिवशी मानले जातात. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीत नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांकडून रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यामुळे आजच्या परिचारिका दिनानिमित्त त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी तुम्ही WhatsApp, SMS, Wishes, Facebook Greetings च्या माध्यमातून द्या शुभेच्छा!(पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी International Nurse Day निमित्त COVID-19 विरुद्ध लढणा-या देशातील तमाम परिचारिकांचे मानले विशेष आभार, पाहा ट्विट)
जागतिक नर्स डे हा एकप्रकारे नर्सिंग संदर्भात जागृकता वाढवण्यासह आरोग्याची काळजी घेण्यासाठी नर्सकडून दिले जाणारे योगदान फार मोलाचे आहे. नर्सकडून आपल्या रुग्णांच्या आवश्यकता पूर्ण करतात. आपल्या रुग्णांना शारीरिक, मानसिक बळ मिळावे यासाठी त्या दिवसरात्र मेहनत करतात. तर लेटेस्टली मराठीच्या टीमकडून जगातील सर्व परिचारिकांना 'हॅप्पी इंटरनॅशलन नर्स डे' च्या शुभेच्छा!