IPL Auction 2025 Live

Happy Datta Jayanti 2019 Images: दत्त जयंतीच्या शुभेच्छा देणारे HD Greetings, Wallpapers, Wishes, WhatsApp Status शेअर करून तुमच्या मित्रपरिवाराला द्या खास संदेश!

यावर्षी 11 डिसेंबर रोजी दत्त जयंती साजरी केली जाणार आहे.

Datta Jayanti 2019 (PC - File Photo)

Happy Datta Jayanti 2019: प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला दत्त जयंती (Datta Jayanti) साजरी केली जाते. यावर्षी 11 डिसेंबर रोजी दत्त जयंती साजरी केली जाणार आहे. या दिवशी श्री दत्तात्रयाची पूजा केली जाते. पौराणिक कथेनुसार, मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाळात भगवान दत्तात्रेयाचा जन्म झाला होता. म्हणून या दिवशी मोठ्या उत्साहात दत्त जयंती साजरी केली जाते. अनेक भाविक दत्त जयंतीच्या दिवशी दिवसभर उपवास करतात. तसेच दत्त मंदिरात जाऊन दत्तात्रयाची पूजा करतात. हे व्रत केल्याने भक्ताच्या मनोकामना पूर्ण होतात. दत्तात्रेयामध्ये 'गुरू' आणि 'देवता' या दोघांचाही मिलाफ असल्याने त्यांना 'गुरूदेव दत्त', असं म्हटलं जातं. या दिवशी अनेकजण आपल्या मित्र-मैत्रिणींना दत्त जयंतीच्या शुभेच्छा देत असतात. तुम्हालाही तुमच्या मित्र-मैत्रिणींना WhatsApp, Facebook द्वारा Wishes, Messages, Greetings च्या माध्यमातून शुभेच्छा द्यायच्या असतील, तर हा लेख तुमच्यासाठी!

दत्त जयंती ही महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गुजरात राज्यात साजरी केली जाते. महाराष्ट्रात दत्ताची अनेक देवस्थान प्रसिद्ध आहेत. नरसिंहवाडी (कोल्हापूर), एकमुखी दत्त नारायणपूर (पुणे) ही महाराष्ट्रातील दत्ताची प्रमुख प्रसिद्ध देवस्थान आहेत. तसेच महाराष्ट्रातील प्रसिद्ध माहूर गड हे ठिकाण दत्ताचे जन्मस्थळ मानले जाते. (हेही वाचा- Margashirsha Guruvar Vrat 2019 Wishes: मार्गशीर्ष गुरूवार व्रताच्या मराठमोळ्या शुभेच्छा HD Images,Greetings, Messages च्या माध्यमातून शेअर करून साजरे करा मंगलमय पर्व!)

Datta Jayanti 2019 (PC - File Photo)

Datta Jayanti 2019 (PC - File Photo)
Datta Jayanti 2019 (PC - File Photo)
Datta Jayanti 2019 (PC - File Photo)
Datta Jayanti 2019 (PC - File Photo)

दत्ताचे स्वरुप हे त्रिगुणात्मक त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा-विष्णू-महेश, असे आहे. सत्त्व, रज आणि तम हे दत्ताचे त्रिगुण आहेत. तसेच निर्मिती, पालन आणि संहार हे त्यांचे कार्य होय. दत्त जयंतीच्या दिवशी दत्ताची पूजा करून व्रत केल्याने पुण्य मिळते, अशी भावना आहे.