Hajj 2023: दिलासादायक! सौदी अरेबियाने हटवले हज यात्रेवरील निर्बंध; आता यात्रेकरूंच्या संख्येवर व वयावर मर्यादा नसेल
सौदी अरब न्यूजने वृत्त दिले आहे की, 2019 मध्ये सुमारे 25 दशलक्ष लोकांनी हज यात्रेत भाग घेतला. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुढील दोन वर्षे यात्रेकरूंची संख्या कमी झाली होती. आता या वर्षी हज करू इच्छिणारे सर्व लोक यात्रेसाठी अर्ज करू शकतात, असे अरब न्यूजच्या वृत्तात म्हटले आहे.
कोरोना महामारीच्या काळात हज यात्रेवर (Hajj 2023) सौदी अरेबियाने (Saudi Arabia) घातलेले निर्बंध आता हटवण्यात आले आहेत. या वेळी कोरोनाच्या आधी होत होती तशीच हज यात्रा होईल. सौदी अरेबियाने सोमवारी जाहीर केले की, यावर्षीच्या हजसाठी यात्रेकरूंच्या संख्येवर कोणतीही मर्यादा नसेल, अरब न्यूजने देशाचे हज आणि उमराह मंत्री तौफिक अल-रबिया यांचा हवाला देऊन हे वृत्त दिले आहे. हज एक्स्पो 2023 मध्ये बोलताना तौफिक अल-रबियाह म्हणाले की, यावर्षी हजमध्ये सहभागी होणार्या लोकांची संख्या महामारीपूर्वीच्या पातळीवर परत येईल आणि या वर्षी हज यात्रेकरूंसाठी वयोमर्यादाही असणार नाही.
कोरोना महामारीचा उद्रेक झाल्यानंतर केवळ 18 ते 65 वयोगटातील लोकांनाच हज करण्याची परवानगी होती. त्याच वेळी, सौदी अरेबियाने हजसाठी प्रवासाची व्यवस्था करण्यासाठी फक्त काही खाजगी कंपन्यांनाच परवानगी दिली होती. मात्र आता हे निर्बंधही हटवण्यात आले आहेत. मात्र, मुस्लिमांना काबाला चुंबन घेण्यास किंवा स्पर्श करण्यास मनाई आहे.
मंत्री तौकीफ अल-रबीह यांनी सांगितले की, उमराह व्हिसाचा कालावधी 30 दिवसांवरून 90 दिवसांपर्यंत वाढवण्यात आला आहे. हज/उमराह व्हिसावर येणारे लोक देशातील कोणत्याही शहरात जाऊ शकतात. हज मंत्री म्हणाले की, 2023 पासून जगभरातील हज एजन्सींना त्यांच्या देशातील हज यात्रेकरूंना आवश्यक सुविधा देण्यासाठी परमिट असलेल्या कोणत्याही कंपनीशी करार करण्याची परवानगी दिली जाईल. (हेही वाचा: मकर संक्रांतीला या गोष्टी दान केल्यास घरात नांदेल लक्ष्मी, कधीही येणार नाही आर्थिक संकट, पाहा यादी)
सौदी अरब न्यूजने वृत्त दिले आहे की, 2019 मध्ये सुमारे 25 दशलक्ष लोकांनी हज यात्रेत भाग घेतला. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुढील दोन वर्षे यात्रेकरूंची संख्या कमी झाली होती. आता या वर्षी हज करू इच्छिणारे सर्व लोक यात्रेसाठी अर्ज करू शकतात, असे अरब न्यूजच्या वृत्तात म्हटले आहे. कोरोनानंतर 2021 मध्ये केवळ सौदी अरेबियाच्या 60,000 लोकांनी हज केले होते. गेल्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये सुमारे 10 लाख यात्रेकरूंनी हज यात्रा केली होती.
मंत्रालयाने म्हटले आहे की, स्थानिक रहिवाशांसाठी हज पॅकेजच्या चार श्रेणी उपलब्ध असतील. यात्रेसाठी अर्ज करणार्या लोकांकडे जुलैच्या मध्यापर्यंत वैध राष्ट्रीय किंवा रहिवासी ओळख असणे आवश्यक आहे. यात्रेकरूंकडे कोरोना विषाणू आणि सीझनल इन्फ्लूएंझा लसीकरणाचा पुरावा असणे आवश्यक आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 10, 2023 06:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

