Guru Purnima 2021 Greetings: गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा Facebook Messages, WhatsApp Status द्वारा शेअर करत द्या आषाढ पौर्णिमेच्या शुभेच्छा!
Ashadha Purnima च्या शुभेच्छा आज सोशल मीडीयात शेअर करून साजरा करा गुरू पौर्णिमेचा दिवस
Happy Gurupurnima 2021 Images: आषाढ पौर्णिमेचा दिवस हा संपूर्ण भारतात गुरुपौर्णिमेचा दिवस म्हणून साजरा केला जात आहे. प्रत्येक वर्षाला आषाढ महिन्याच्या पौर्णिमेच्या तिथीदिवशी आपल्या गुरुंच्या प्रति आदर आणि सन्मान व्यक्त करण्यासाठी गुरु पौर्णिमा साजरी केली जाते. गुरु पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असे सुद्धा म्हटले जाते. कारण या शुभ तिथी दिवशी महर्षि कृष्ण व्यास म्हणजेच महर्षि वेद व्यास यांचा जन्म झाला होता. महाभाराताची रचना, चार वेद आमि 18 पुराणांच्या रचनेचे श्रेय सुद्धा संस्कृतिचे महान विद्वान महर्षि वेद व्यास यांना दिले जाते. या दिवशी प्रत्येक शिष्य आपल्या गुरुंची विशेष पूजा केली जाते. त्याच्याद्वारे करण्यात आलेले मार्गदर्शन आणि ज्ञान यासाठी आभार मानले जातात.या खास दिवसानिमित्त आपल्या गुरुंना गुरुपौर्णिमेच्या खास मराठमोठी शुभेच्छापत्र WhatsApp Status, Facebook Greetings, SMS, GIF, Messages पाठवून त्यांना करा वंदन. यंदा कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमुळे गुरुपौर्णिमेचा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा केला जातो. हिंदू धर्मानुसार गुरुंना देवापेक्षा अधिक मान दिला गेला आहे. यासाठी आपल्या गुरुंच्या प्रति आभार व्यक्त केला जातो.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरुंसह आपल्या मोठ्या व्यक्तींचे आशीर्वाद घेतले जातात. तसेच आपल्या गुरुंची पूजा करण्याची परंपरा असते. असे मानले जाते की, गुरुशिवाय कोणत्याही व्यक्तीला ज्ञान मिळत नाही. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात गुरुंचे स्थान असणे अत्यंत महत्वपूर्ण मानले जाते.