Guru Nanak Jayanti 2022 Wishes: गुरु नानक यांच्या जयंती निमित्त Messages, WhatsApp Status, Greetings, Wallpapers च्या माध्यमातून द्या गुरपुरबच्या शुभेच्छा!

संपूर्ण विश्व हे ओंकारातून निर्माण झाले असून, हा ओम तुम्ही गुरु कृपेमुळेच जाणवू शकता. जे आहे ते सर्वत्र आहे पण ते जाणण्यासाठी गुरूंची गरज आहे. असा संदेश या श्लोकातून देण्यात आला आहे.

गुरू नानक जयंती । File Image

भारत हा विविधतेमध्ये एकता जपणारा देश आहे. शीख धर्माचे संस्थापक आणि त्यांचे पहिले गुरू म्हणजे गुरू नानक. कार्तिकी पौर्णिमेच्या (Kartiki Pournima)  दिवशी गुरू नानक (Guru Nanak) यांचा जन्म झाला असं मानलं जातं. त्यानुसार हिंदू कॅलेंडर प्रमाणे शीख बांधव कार्तिकी पौर्णिमेला त्यांछा जन्म दिवस साजरा करतात. यंदा हा सोहळा 8 नोव्हेंबर दिवशी साजरा केला जाणार आहे. मग यंदा तुमच्या शीख मित्रमंडळींना या मंगल पर्वाच्या शुभेच्छा देत हा दिवस साजरा करण्यासाठी खास मेसेजेस, शुभेच्छापत्र, Greetings, HD Images, WhatsApp Status शेअर करत तुम्ही हा दिवस साजरा करू शकता.

पाकिस्तान मध्ये असलेल्या करतारपूर साहिब हे शीखांच्या पवित्र तीर्थक्षेत्रापैकी एक आहे. अशी धारणा आहे की याच गुरुद्वारामध्ये गुरु नानक यांचे निवासस्थान होते. दरम्यान शीख बांधव गुरू नानक जयंती दिवशी त्यांचे उपदेशांचे पठण करतात. एकमेकांना शुभेच्छा देतात.

गुरूनानक जयंतीच्या शुभेच्छा

गुरू नानक जयंती । File Image
गुरू नानक जयंती । File Image
गुरू नानक जयंती । File Image
गुरू नानक जयंती । File Image
गुरू नानक जयंती । File Image

गुरुपुरब निमित्त गुरुद्वारामध्ये लंगरचे आयोजन करण्यात येते. गुरुद्वारा आणि नागरिकांच्या घरी लोक गुरुबाणीचा पाठ सुद्धा करतात. या दिवशी काही ठिकाणी मिरवणूक आणि शोभा यात्रा सुद्धा काढल्या जातात. शीख धर्मियांचा पवित्र ग्रंथ म्हणजेच गुरु ग्रंथसाहिब मधील सुरुवातीची प्रार्थना 'जपजी साहिब' ही गुरु नानक यांनी लिहिली आहे. संपूर्ण विश्व हे ओंकारातून निर्माण झाले असून, हा ओम तुम्ही गुरु कृपेमुळेच जाणवू शकता. जे आहे ते सर्वत्र आहे पण ते जाणण्यासाठी गुरूंची गरज आहे. असा संदेश या श्लोकातून देण्यात आला आहे.