Happy Gudi Padwa 2021 Images: गुढीपाडवा शुभेच्छा संदेश, HD Wallpaper, WhatsApp, Facebook Status द्वारे सणाचा आनंद वाढवा

Gudi Padwa 2021 | (File Image)

Happy Gudi Padwa HD Images: हिंदू पंचागांनुसार नववर्षाची सुरुवात म्हणजे गुढी पाडवा (Gudi Padwa 2021). चैत्र शुद्ध प्रदिपदला साजरा होणार सण म्हणजे गुढी पाडवा. शालनिवाहन संवस्तराचा पहिला दिवस म्हणजेच गुढी पाडवा (Gudi Padwa). साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून ओळखला जाणारा सण म्हणजे गुढी पाडवा. मराठी नववर्षाची सुरुवात म्हणजे गुढी पाडवा. अशा या गुढी पाडवा सणाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. असाश शुभेच्छा जर आपण आपले मित्र, आप्तेष्ट आणि नातेवाईकांना देऊ इच्छित असाल तर त्यासाठी खास Gudi Padwa 2021 WhatsApp, Facebook Status, Messages HD Images इथे देत आहोत. या Gudi Padwa 2021 HD Images वापरुन तुम्ही अनेकांना शुभेच्छा देऊ शकता.

अतिषय पवित्र आणि महत्त्वाचा म्हणून ओळखला जाणारा गुढी पाडवा यांदा 13 एप्रिल या दिवशी आला आहे. याच दिवसापासून नवरात्रोत्सव पर्वही सुरु होत आहे. गुढी पाडवा हा सण महाराष्ट्र आणि गोवा, केरळ या राज्यांमध्येही साजरा होतो. या राज्यांमध्ये हा गुढी पाडवा हा 'संवत्सर पाडवो' नावाने साजरा केला जातो. काश्मीर राज्यात नवरेह, मणिपूरमध्ये सजिबू नोंगमा पानबा, कर्नाटकमध्ये हाच पाडवा युगाडी पर्व नावाने ओळखतात तर आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यांमध्ये हा दिवस उगाडी, अशा वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो.

Gudi Padwa 2021 | (File Image)
Gudi Padwa 2021 | (File Image)
Gudi Padwa 2021 | (File Image)
Gudi Padwa 2021 | (File Image)
Gudi Padwa 2021 | (File Image)

यंदा 13 एप्रिल 2021 या दिशी साजरा होणाऱ्या गुढी पाडव्याचा मुहूर्त सुर्योदोय झाल्यापासून सकाळी 6.24 वाजलेपासून ते सायंकाळी सुर्यास्त होईपर्यंत 6 वाजून 54 मिनिटांपर्यंत आहे. गुढी पाडव्याला सरस्वती देवीची पूजा करण्याचा प्रघात आहे. तसेच, घरोघरी गुढीही उभारली जाते. बांबूच्या उंच काठीला नवे वस्त्र बांधले जाते. त्याला नारळाचा हार घातला जातो. वरती तांब्या लावला जातो. ग्रामिण भागात उंचच उंच गुढी उभारली जाते. शहरी भागात अनेकदा जागेची समस्या असते. त्यामुळे आटोपशीर उंचीवर गुढी उभारण्यास प्राधान्य दिले जाते.