IPL Auction 2025 Live

Dr. Bhupen Hazarika 96th Birth Anniversary Google Doodle: गुगलने खास डूडलद्वारे साजरी केली गायक भूपेन हजारिका यांची जयंती

गुगलने म्हटले आहे की, "हॅपी बर्थडे भूपेन हजारिका! तुमची गाणी आणि चित्रपट आसामच्या समृद्ध संस्कृतीचा गौरव करतात."

Dr. Bhupen Hazarika 96th Birth Anniversary Google Doodle (PC - Twitter)

Dr. Bhupen Hazarika 96th Birth Anniversary Google Doodle: गुगलने आज प्रसिद्ध भारतीय गायक, संगीतकार आणि चित्रपट निर्माते डॉ. भूपेन हजारिका यांचा 96 वा वाढदिवस एका खास डूडलद्वारे साजरा केला. शेकडो चित्रपटांना संगीत देणाऱ्या हजारिका यांचा जन्म 1926 साली आसाममध्ये झाला. गुगलने म्हटले आहे की, "हॅपी बर्थडे भूपेन हजारिका! तुमची गाणी आणि चित्रपट आसामच्या समृद्ध संस्कृतीचा गौरव करतात. मुंबईस्थित कलाकार रुतुजा माळी यांनी रंगवलेली ही कलाकृती आसामी सिनेमा आणि लोकसंगीत लोकप्रिय करण्यासाठी हजारिका यांच्या कार्याचा गौरव करते."

हजारिका यांचा जन्म 1926 मध्ये ईशान्य भारतात 9 स्टेंबर रोजी झाला. त्याचे मूळ गाव आसाममध्ये आहे. आसाम हा असा प्रदेश आहे, जो नेहमीच वेगवेगळ्या जमाती आणि अनेक स्वदेशी गटांचे निवासस्थान आहे-जसे की बोडो, कार्बी, मिसिंग आणि सोनोवाल-कचारी. तरुण वयात, हजारिकाच्या संगीत प्रतिभेने प्रसिद्ध आसामी गीतकार, ज्योतिप्रसाद अग्रवाला आणि चित्रपट निर्माते, बिष्णू प्रसाद राभा यांचे लक्ष वेधून घेतले. हे दोन्ही आसामच्या समृद्ध सांस्कृतिक इतिहासाचे नायक आहेत. त्यांनी हजारिकाला त्यांचे पहिले गाणे रेकॉर्ड करण्यास मदत केली. ज्यांनी त्यांची संगीत कारकीर्द 10 व्या वर्षी सुरू केली. वयाच्या 12 व्या वर्षी, हजारिका यांनी दोन चित्रपटांसाठी गाणी लिहिली आणि रेकॉर्ड केली. कालांतराने, हजारिकाने असंख्य रचना तयार केल्या, ज्यात गाण्यांद्वारे लोकांच्या कथा सांगण्याचा त्यांचा ध्यास होता.

हजारिका हे केवळ बालसंगीताचे प्रतिभावंत नव्हते तर ते एक बुद्धिजीवीही होते. त्यांनी 1946 मध्ये बनारस हिंदू विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी संपादन केली आणि 1952 मध्ये कोलंबिया विद्यापीठातून मास कम्युनिकेशनमध्ये पीएचडी मिळवली.

अमेरिकेतील शिक्षण पूर्ण केल्यानंतर, आसामी संस्कृतीला राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर लोकप्रिय करणारी गाणी आणि चित्रपटांवर काम सुरू ठेवण्यासाठी ते भारतात परतले. सहा दशकांच्या कारकिर्दीत, हजारिका यांनी संगीत आणि संस्कृतीतील अतुलनीय योगदानासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मश्री आणि पद्मभूषण यांसारखी अनेक प्रतिष्ठित पारितोषिके जिंकली. 2019 मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी भारत सरकारच्या राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळासह अनेक मंडळे आणि संघटनांचे अध्यक्ष आणि संचालक म्हणून काम केले.