Ghatasthapana 2024: नवरात्री मध्ये घटस्थापना दिवशी रूजवण कशी केली जाते? घ्या जाणून
त्याच वेळी, अभिजीत मुहूर्त सकाळी 11:46 ते दुपारी 12:33 पर्यंत आहे.
भारतामध्ये यंदा 3 ऑक्टोबरला शारदीय नवरात्रीची (Shardiya Navratri) सुरूवात होणार आहे. घटस्थापनेपासून (Ghatasthapana) या नवरात्रीची सुरूवात होते. यावर्षी हा नवरात्र उत्सव 10 दिवस साजरा केला जाणार आहे. 3 ते 12 ऑक्टोबर दरम्यान हा नवरात्र उत्सव साजरा केला जाईल. महाराष्ट्रात घटस्थापनेदिवशी घट स्थापन करताना रूजवण घालण्याची रीत आहे. नवरात्रीचे नऊ दिवस सात धान्यांचं रूजवण घालून नवरात्रीची सुरूवात केली जाते. मग उद्यावर येऊन ठेपलेल्या नवरात्रीच्या पहिल्या रूजवण घालण्यासाठी नेमकं काय लागणार? हे जाणून घेत पहा यंदा हे रूजवण कसं घालाल? नक्की वाचा: Shardiya Navratri 2024 Colours With Days: 3 ऑक्टोबर पासून सुरू होत शारदीय नवरात्री मध्ये यंदा कोणत्या दिवशी कोणता रंग? पहा 10 दिवसांचे रंग.
रूजवण घालण्यासाठी काय लागतं?
गहू, जव, तीळ, धान (तांदूळ), मूग, बाजरी, चणे या सप्तधान्यांचे नवरात्रीमध्ये रूजवण केले जाते. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या आराधनेसोबत या रूजवणाकडेही विशेष लक्ष दिले जाते. जितकं रूजवण बहारदार येणार तितकी देवीची कृपा अधिक अशी हिंदू धर्मीयांची मान्यता आहे.
रूजवणं कसं घालणार?
रूजवण घालण्यासाठी मातीचं मडकं बाजरातून विकत आणा. ते ओलं करा. रूजवण घालण्यासाठी माती आणि थोडी वाळू देखील ओली करून ठेवा. रूजवण घालण्याच्या आदल्या दिवशी सप्तधान्य भिजत ठेवा. 6-7 तास भिजलेल्या धान्यांची रूजवण अधिक चांगली येते. घटस्थापनेदिवशी रूजवण मातीत घालून त्याची पुढे नऊ दिवस निगा राखा. नियमित पाणी घाला. दरम्यान बहारदार रूजवण येण्यासाठी काही जण यामध्ये हळदीचं पाणी देखील घालतात. मातीचं भांडे थोड्या काळोख्या ठिकाणी ठेवल्यानंतर धान्य चांगलं रूजण्यास मदत होते.
घटस्थापनेचा मुहूर्त
घट स्थापनेसाठी यंदा 3 ऑक्टोबरला घट स्थापन करण्याचा मुहूर्त सकाळी 06:15 ते 07:22 पर्यंत आहे. त्याच वेळी, अभिजीत मुहूर्त सकाळी 11:46 ते दुपारी 12:33 पर्यंत आहे. दरम्यान या रूजवणाला नवरात्रीमध्ये विसर्जनादिवशी मुली, स्त्रियांना दिले जाते. देवीचा आशीर्वाद म्हणून ते केसांत माळले जाते.