Gatari Amavasya 2026 Date: गटारी अमावस्याची तारीख, महत्व आणि साजरा करण्याची पद्धत, घ्या जाणून
महाराष्ट्रात 13 ऑगस्ट पासून श्रावण सुरू होणार आहे. तर श्रावण महिन्याची सांगता 11 सप्टेंबरला होणार आहे. मग पहा यंदा गटारी कधी साजरी करू शकाल?
Gatari Amavasya 2026 Date in Maharashtra: गटरी अमावस्या (Gatari Amavasya) हा श्रावण महिना (Shravan Month) सुरू होण्याच्या आधीचा दिवस आहे. यंदा महाराष्ट्रात श्रावण महिना हा 13 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. श्रावण मासारंभाची जितकी उत्सुकता असते तितकेच मांसाहारप्रेमी हा श्रावण महिना सुरू होण्याआधी अखेरचा मांसाहार खाण्यासाठी आखाड पार्टी किंवा गटारी पार्टीच्या तयारीसाठी सज्ज असतात. अनेकजणांचे मित्र मंडळी, घर-परिवार आणि नातलगांसोबत गटारी पार्टीचे मोठे प्लॅन्स असतात. When is Gatari: यंदा श्रावणाआधी च्या रविवारी संकष्टी आणि एकादशी; मग गटारी किंवा आखाड पार्टी कधी?
आषाढी अमावस्या ही गटारी म्हणून खास साजरी होत असल्याने अनेकांना या गटारी अमावस्येबद्दल तसेच त्याच्या सेलिब्रेशन बद्दलही अनेक समज गैर समज आहेत. मग आज तुमच्या मनातील हे गटारी बद्दलच्या काही संभ्रमांना दूर करा.
गटारी 2026 नेमकी कधी?
गटारीचा मूळातच काही सांस्कृतिक, धार्मिक संबंध नाही त्यामुळे त्याबद्दल रीती-रिवाजांचं बंधन नाही. खाद्यप्रेमींनी मांसाहाराच्या प्रेमातून या गटारीचं आयोजन करायला आणि मोठं स्वरूप करायाला मदत केली आहे. श्रावणाआधीच्या एखाद्या मांसाहाराच्या दिवशी गटारी साजरी केली जाते. त्यामुळे तुमच्या घरातल्यांच्या मांसाहार करण्याच्या सोयीनुसार वार निवडून गटारी केली जाते. यंदा आषाढ अमावस्या बुधवार 12 ऑगस्टला असल्याने अनेकजण त्या दिवशी देखील गटारी साजरी करू शकतात.
गटारी आणि गतहारी अमावस्या म्हणजे काय?
गतहारी हा मूळ शब्द आहे. ज्याचा अर्थ 'त्यागलेला आहार' आहे. ज्या आहाराचा त्याग केला जाणार आहे तो आहार घेण्याचा शेवटचा दिवस म्हणून गतहारी अमावस्या असे. मात्र या शब्दाच्या चूकीच्या उच्चारामुळे/ अपभ्रंशामुळे गतहारीचे 'गटारी' झाले. त्याच्यासोबत मद्यपान जोडले गेले आणि सणाला चूकीच्या समजूतींमुळे 'गटारी' म्हणून संबोधण्यात आले. गटारीचा मद्यपानाशी किंवा गटारात लोळण्याशी काहीही संबंध नाही.
गटारी संबंधित काही समज-गैरसमज
1. यंदा आषाढ अमावस्येला सूर्यग्रहण मग गटारी होणार का?
12 ऑगस्टचं सूर्यग्रहण भारतात होणार नसल्याने ग्रहणाशी संबंध नाही. बुधवार असल्याने ज्यांना मांसाहार करायचा आहे ते रोजच्या साखरेच आहार घेऊ शकतात. खाण्याच्या वेळेवर निर्बंध नाही.
2. दीप अमावस्येला गटारी होणार का?
दीप अमावस्येचं व्रत हे भगवान शंकरांसाठी असल्याने जे दिवसभर ते पाळणार आहेत त्यांच्यासाठी दीप अमावस्येचा दिवस हा मांसाहार न खाण्याचा असल्याने गटारी 12 ऑगस्टला न करता आधी करावी लागेल.
3. गटारीला मांसाहार आणि मद्यपान केले जाते का?
गटारीचा दिवस साजरा करण्याचा उद्देशच पुढील किमान 1-4 महिना मांसाहार, मद्यपान याचा त्याग केला जाणारा दिवस आहे. त्यामुळे पुढील संयमासाठी स्वतःला तयार करताना अनेकजण गटारीला दोन्हीचा शेवटचा आस्वाद घेतात.
4. गटारी अमावस्या 2026 वेळ आणि तारीख काय?
गटारी अमावस्या 12 ऑगस्टला आहे. रात्री 11.06 ला अमावस्या समाप्ती होणार आहे. 13 ऑगस्टपासून श्रावण महिन्याची सुरूवात आहे.
4. 'गटार' आणि 'गटारी' चा काही संबंध आहे का?
गटार आणि गटारीचा काहीही संबंध नाही. गतहारीचा अपभ्रंश होऊन बोलीभाषेत गटारी म्हटले जाऊ लागले आहे. गटारीला गटारात लोळण्याचा काहीही संबंध नाही. हा दिवस केवळ एकत्र मांसाहारावर ताव मारण्याच्या निमित्ताने भेटण्याचा दिवस आहे.
महाराष्ट्रात 13 ऑगस्ट पासून श्रावण सुरू होणार आहे. तर श्रावण महिन्याची सांगता 11 सप्टेंबरला होणार आहे. श्रावण महिन्यात सणांची रेलचेल, व्रत वैकल्य पाळली जात असल्याने सणांचा राजा असलेला हा महिना हिंदू धर्मियांसाठी पवित्र महिना आहे.