Ganpati Invitation Card Template Marathi: गणपती दर्शनासाठी मित्रमंडळी, नातेवाईकांना आमंत्रण पाठवण्यासाठी खास मराठमोळे मेसेजेस
बाप्पाच्या आगमनानंतर किमान दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि दहा दिवस बाप्पा भाविकांच्या सेवेमध्ये असणार आहे. मग या तुमच्याघरी बाप्पाच्या दर्शनाला प्रियजणांना नक्की आमंत्रित करून या सणाचा आनंद द्विगुणित करा.
गणपती बाप्पाचं आगमन आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलं आहे. बाप्प्पाच्या मखरापासून ते अगदी मोदक आणि प्रसादापर्यंत सारीच तयारी सुरू झाली आहे. पण या लगबगीमध्ये तुअचं यंदाचं आमंत्रण तयार आहे? बाप्पा घरी येणार म्हणजे मित्रमंडळी, नातेवाईक, आप्तेष्ट यांची बाप्पाच्या दर्शनासाठी ये-जा सुरू होणार मग त्यांना घरी आमंत्रित करण्यासाठी खास WhatsApp Messages तयार आहेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार ते कस्टमाईज्ड करून यंदाचं गणपती दर्शनाचं आमंत्रण पाठवू शकता. WhatsApp, Instagram, SMS, Telegram च्या माध्यमातून हे आमंत्रण आजच शेअर करा.
यंदा गणेश उत्सव 14 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर साजरा केला जाणार आहे. यामध्ये 14 सप्टेंबरला सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सवाला सुरूवात होईल. बाप्पाच्या आगमनानंतर किमान दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि दहा दिवस बाप्पा भाविकांच्या सेवेमध्ये असणार आहे. मग या तुमच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला प्रियजणांना नक्की आमंत्रित करून या सणाचा आनंद द्विगुणित करा. नक्की वाचा: Ganesh Chaturthi 2026: हरतालिका, गणेश चतुर्थी यंदा एकाच दिवशी मग बाप्पाची प्राणप्रतिष्ठा कधी? जाणून घ्या मुहूर्ताची वेळ .
गणेश उत्सव 2026 आमंत्रण पत्रिका नमुने
नमुना 1:
श्री गणेशाय नमः
आमच्याकडे यंदाही सालाबादाप्रमाणे लाडक्या बाप्पाचे आगमन होत आहे. आपण आपल्या परिवारासह बाप्पाच्या दर्शनाला अवश्य यावे, ही आग्रहाची व प्रेमळ विनंती.
आगमन: [तारीख]
विसर्जन: [तारीख]
स्थळ: [पत्ता]
आपली उपस्थिती हीच आमच्यासाठी बाप्पाची कृपा असेल.
गणपती बाप्पा मोरया!
नमुना 2:
गणपती बाप्पा मोरया!
आमच्याकडे यंदा सालाबादाप्रमाणे गणपती बाप्पासह गौरींचेही आगमन होणार असून, आपण सहकुटुंब बाप्पा व गौरींच्या दर्शनाला यावे, ही प्रेमळ विनंती.
गणपती आगमन:
गौरी आगमन:
गौरी पूजन व नैवेद्य:
विसर्जन:
पत्ता:
आपल्या उपस्थितीने आमचा सण अधिक खास होईल.
नमुना 3:

गणपती बाप्पा मोरया
सुखकर्ता, दुःखहर्ता, विघ्नहर्ता गणरायाचे यंदाही आमच्या घरी सालाबादाप्रमाणे प्रेमाने आगमन होत आहे. आपल्या साथीने व आशीर्वादाने हा उत्सव अधिक मंगलमय व्हावा, यासाठी आपणास सहपरिवार दर्शनासाठी सादर आमंत्रण.
गणेश आगमन: [तारीख]
पूजा व आरती वेळ: [वेळ]
विसर्जन: [तारीख]
पत्ता: [पत्ता]
आपल्या शुभेच्छा व उपस्थिती आमच्यासाठी अनमोल आहे.
"गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!"
नमुना 4:
गणपती बाप्पा मोरया!
आमच्याकडे यंदा सालाबादाप्रमाणे गणपती बाप्पाचे आगमन होणार असून, दीड दिवसांच्या गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आपण सहकुटुंब बाप्पाच्या दर्शनाला यावे, ही प्रेमळ विनंती.
दिनांक: [तारीख टाका]
आगमन: [वेळ टाका]
विसर्जन: [तारीख/वेळ टाका]
पत्ता: [पत्ता टाका]
आपल्या उपस्थितीने आमचा उत्सव अधिक आनंददायी होईल.
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!
गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे. 64 कलांचा अधिपती गणपती घरी विराजमान झाल्यानंतर आपोआपच घरातील वातावरण चैतन्यमय होते. मग अशा या मंगलसमयी सणाचा आनंद तुमच्या जवळच्या लोकांसोबत सण साजरा करून अजून द्विगुणित करा. गौरी गणपतीच्या निमित्ताने घरात सारी मंडळी एकत्र जमतात. खास जेवणाचा, गोड-धोडाच्या पदार्थांची रेलचेल असते. या सणा निमित्त जुने पारंपारिक खेळ देखील खेळले जातात.गणेशोत्सवातील याच लहान लहान क्षणांचा आनंद पुढे वर्षभर स्नेहबंध जपण्यासाठी पुरेसा असतो.
(The above story first appeared on LatestLY on Sep 12, 2026 03:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

