Gauri Ganpati Invitation Card Format in Marathi: गौरी-गणपतीचं आमंत्रण देण्यासाठी खास मराठमोळे मेसेज नमुने
यंदा आपल्या माणसांना थोडं वेगळं, मनापासूनचं आमंत्रण देऊन हा उत्सव अधिक संस्मरणीय बनवा. मग त्यासाठी हे खास मेसेजेस WhatsApp, Instagram च्या माध्यमातून नक्की शेअर करा.
लोकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने साजरा केला जाणारा सण म्हणजे गणेश उत्सव. यंदा बाप्पाचं आगमन 14 सप्टेंबरला होणार आहे. घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवासाठी सध्या सर्वत्र लगबग आणि तयारी मोठ्या उत्साहात सुरू आहे. गणेश चतुर्थीला घरोघरी बाप्पांची प्रतिष्ठापना करणे ही केवळ एक धार्मिक परंपरा नाही, तर ती संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणणारी, नाती घट्ट करणारी आणि घरात चैतन्य निर्माण करणारी एक सुंदर सांस्कृतिक प्रथा आहे. मग अशा या मंगल सोहळ्यात तुमच्या नातेवाईकांना, आप्तेष्टांना, मित्र मंडळींना घरी गौरी गणपतीच्या दर्शनाला आमंत्रित करण्यासाठी खास आमंत्रण देखील पाठवा. WhatsApp, SMS च्या माध्यमातून तुम्ही नक्कीच त्यांना घरी बाप्पाच्या दर्शनाचं आणि तीर्थ प्रसादाला येण्याचं आमंत्रण देऊ शकता.
यंदा गणपती बाप्पाचं आगमन 14 सप्टेंबरला तर गौरी आवाहन 17 सप्टेंबरला होणार आहे. या निमित्ताने तुमच्या घरी गौरी-गणपतीच्या दर्शनाला प्रियजणांना आमंत्रित करण्यासाठी खास व्हॉट्सअॅप मेसेज बनवून नक्की पाठवा.
गौरी गणपती दर्शनाच्या आमंत्रण पत्रिकेसाठी काही खास नमुने
नमुना 1:

॥ मंगलमूर्ती मोरया ॥
आणि गौरीमातेच्या पवित्र आगमनाचा
हा आनंदसोहळा आपल्या स्नेहाच्या उपस्थितीने
अधिक सुंदर व्हावा.
गौरी-गणपतीचे दर्शन व प्रसादाचा लाभ घ्यावा,
ही मनःपूर्वक विनंती.
लंबोदर, गणनायक, गणराया घरी येत आहे,
सुख-समृद्धीचा वर्षाव घेऊन तो सजला आहे!
चला सारे मिळून थाटात त्याचे स्वागत करूया,
आपल्या साथीने उत्सवाचा रंग अधिक खुलवूया!
आपली उपस्थिती आम्हाला अत्यंत हवीहवीशी वाटेल.
गौरीच्या आगमनाने वाढला आनंद!
आपली उपस्थिती लाभावी,
आणि बाप्पाचा आशीर्वाद घ्यावा,
ही प्रेमपूर्वक विनंती.
नमुना 4:

॥ श्री गणेशाय नमः ॥
गौरी-गणपती आगमन सोहळा
श्री गणरायाच्या मंगलमय आगमनाने
आमच्या घरात आनंद, उत्साह आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या मंगल प्रसंगी गौरी-गणपतीच्या दर्शनासाठी व प्रसादासाठी
आपण सहकुटुंब आवर्जून यावे,
हीच श्रींच्या चरणी प्रेमपूर्वक विनंती.
आपले स्नेहांकित,
पत्ता:
घरगुती गणेशोत्सव हा श्रद्धा, परंपरा आणि कुटुंबभावनेचा सुंदर संगम आहे. साधेपणाने पण मनोभावे साजरा केलेला हा उत्सव वर्षभर पुरणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचा स्रोत ठरतो. यंदा आपल्या माणसांना थोडं वेगळं, मनापासूनचं आमंत्रण देऊन हा उत्सव अधिक संस्मरणीय बनवा.
(The above story first appeared on LatestLY on Sep 10, 2026 04:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

