Ganpati Invitation Card Messages in Marathi: गणपतीत प्रियजणांना घरी बोलावण्यासाठी WhatsApp Messages, Images च्या माध्यमातून शेअर करा या 'आमंत्रण पत्रिका'

अनेक घरांमध्ये नातेवाईक आणि मित्रमंडळी दर्शनासाठी येतात, ज्यामुळे सामाजिक बंधही अधिक घट्ट होतात. म्हणून यंदा नेहमीपेक्षा थोडं वेगळं आमंत्रण देण्यासाठी नक्की थोडा खास मेसेज करा.

गणेश उत्सव 2026

Ganpati Invitation Card Template Marathi: गणेश चतुर्थीला (Ganesh Chaturthi) घरी गणपती बाप्पांची स्थापना करणे हे केवळ धार्मिक कर्तव्य नसून, ते कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारे एक माध्यम आहे. दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस किंवा दहा दिवस अशा वेगवेगळ्या कालावधीसाठी बाप्पांची घरा घरात प्रतिष्ठापना केली जाते, जी घराघरातील परंपरेनुसार ठरलेली असते. या काळात घरात सकारात्मक आणि पवित्र वातावरण निर्माण होते. मग अशा मंगलमय प्रसंगी तुमच्या जवळकच्या नातेवाईकांना, मित्र मंडळींना आमंत्रित करण्यासाठी खास निमंत्रण पत्रिका नमुना शोधताय? मग आम्ही तुमच्यासाठी खास निमंत्रण पत्रिकेचे नमुने दिले आहेत. तुम्ही ते तुमच्या सोयीप्रमाणे बदलून, त्यामध्ये माहिती समाविष्ट करून WhatsApp, SMS, Messages च्या माध्यमातून शेअर करून यंदाच्या गणेश उत्सवाचं आमंत्रण देऊ शकता.

गणेश उत्सव 2026 आमंत्रण पत्रिका नमुने

नमुना 1:

गणेश उत्सव 2026

॥ श्री गणेशाय नमः ॥

नमस्कार,
यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त आमच्या निवासस्थानी 14 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर दरम्यान श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. आपण आपल्या कुटुंबासह उपस्थित राहून बाप्पाचे दर्शन घ्यावे व आशीर्वाद घ्यावेत, अशी सप्रेम विनंती.

मूर्ती प्रतिष्ठापना: 

आरतीची वेळ:

स्थळ:

आपली उपस्थिती आम्हाला अत्यंत आनंददायी वाटेल.
कळावे,

नमुना 2:

॥ श्री गणेशाय नमः ॥

"वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ,

निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा"

गणपती बाप्पा हे आपल्या सर्वांच्या घराघरात आनंद, समृद्धी आणि मांगल्य घेऊन येणारे लाडके दैवत. विघ्नहर्ता, बुद्धीची देवता म्हणून पूजल्या जाणाऱ्या गणरायाचे आगमन म्हणजे प्रत्येक मराठी घरासाठी एक उत्सवाचा, आनंदाचा आणि श्रद्धेचा क्षण असतो. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येतात, नातेवाईक-मित्रमंडळींची भेट होते आणि घरात एक वेगळेच चैतन्य निर्माण होते.

यंदाही आमच्या घरी हा मंगलमय सोहळा साजरा करण्यात येत असून, श्री गणरायाच्या आगमनाचा आनंद आपल्यासोबत वाटून घेण्याची आम्हाला मनापासून इच्छा आहे. बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन, त्यांचे दर्शन घेऊन आपण आमच्या या आनंदात सहभागी व्हावे, अशी सप्रेम विनंती आहे.

आपली उपस्थिती ही आमच्यासाठी बाप्पाच्या आशीर्वादाइतकीच मोलाची असेल.

गणेश स्थापना: [तारीख], [वार], सकाळी [वेळ]

 आरतीची वेळ: सकाळी [वेळ] व सायंकाळी [वेळ]

 गणेश विसर्जन: [तारीख]

पत्ता: [संपूर्ण पत्ता]

नमुना 3:

लंबोदर, गणनायक, विघ्नहर्ता बाप्पा आमच्या घरी येत आहे,

आनंदाचा, मांगल्याचा वर्षाव घेऊन तो सजला आहे!

चला सारे मिळून, गणरायाचे करूया थाटात स्वागत,

आपल्या साथीने अधिक फुलेल, हा उत्सवाचा आनंद!

आपल्या उपस्थितीने आमचा उत्सव अधिक सुंदर होईल. जरूर यावे!

- [नाव] व परिवार

नमुना 4:

Ganpati Bappa Morya

आला आला गणराया, घेऊन सुख समृद्धीचा ठेवा,

दूर्वा, मोदक अन् आरतीने, सजला आमुचा गाव-गाव!

आपल्या उपस्थितीने आमचा उत्सव अधिक सुंदर होईल. जरूर यावे!
आरतीची वेळ-
पत्ता-
आमंत्रक-

 

घरगुती गणेश उत्सव हा श्रद्धा, परंपरा आणि कुटुंबभावनेचा सुंदर संगम आहे. पर्यावरणाचे भान राखत, साधेपणाने पण मनोभावे साजरा केलेला हा उत्सव प्रत्येक कुटुंबासाठी वर्षभर पुरणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचा स्रोत ठरतो. यंदा बाप्पाचं आगमन 14 सप्टेंबर 2026 ला होणार आहे. त्यानंतर गौराईंचं आगमन 17 सप्टेंबरला होणार असून गौरी- गणपती विसर्जन 19 सप्टेंबरला होणार आहे. Ganeshotsav 2026 Dates: यंदा सार्वजनिक गणेशोत्सव 10 नव्हे, तर तब्बल 12 दिवसांचा; जाणून घ्या कारण .

घरगुती गणेशोत्सव हा केवळ धार्मिक विधी नसून, तो कुटुंबातील नाती दृढ करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. लहान मुलांना परंपरा आणि संस्कृतीची ओळख करून देणे, वडीलधाऱ्यांचा सहभाग, आणि शेजाऱ्यांसोबत आनंद वाटून घेणे हे या उत्सवाचे वैशिष्ट्य आहे. अनेक घरांमध्ये नातेवाईक आणि मित्रमंडळी दर्शनासाठी येतात, ज्यामुळे सामाजिक बंधही अधिक घट्ट होतात. म्हणून यंदा नेहमीपेक्षा थोडं वेगळं आमंत्रण देण्यासाठी नक्की थोडा खास मेसेज करा.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement