Father's Day 2022: वडिलांवरील Bollywood चे हे Songs ऐकून जुन्या आठवणी होतील ताज्या, फादर्स डे निमित्त वडिलांनाही सुंदर गाणी ऐकवून व्यक्त करा प्रेम

ही गाणी ऐकल्यानंतर तुमच्या जुन्या आठवणीही ताज्या होतील.

Father's Day 2022: व्यस्त जीवनामुळे वडिलांना हवा तेवढा वेळ आणि आनंद आपण देऊ शकत नाही. 19 जून रोजी फादर्स डे आहे. मुला-मुलींसाठी ही एक चांगली संधी आहे, जेव्हा तुम्ही तुमच्या वडिलांप्रती प्रेम व्यक्त करू शकता. फादर्स डे लोक वडिलांना भेटवस्तू देतात आणि केक कापतात. वडिलांना बाहेर फिरायला घेऊन जातात. त्याचबरोबर तुम्ही घरी बसूनही हा दिवस खास बनवू शकता. बाप-मुलगा-मुलीच्या नात्याचं महत्त्व बॉलिवूडलाही कळतं. त्यामुळे या खास नात्यावर बॉलिवूडमध्ये दंगल, उडान, पिकू असे अनेक चित्रपट बनले आहेत. कोणाला बघून असे वाटते की एक बाप आपल्या मुलाच्या भल्यासाठी किती संघर्ष करतो. प्रत्येक कठीण प्रसंगात मुलांसोबत तो खडकासारखा खंबीरपणे उभा असतो. या फादर्स डेनिमित्त आम्ही तुमच्यासाठी काही खास बॉलिवूड गाणी घेऊन आलो आहोत, जी तुम्ही तुमच्या वडिलांसोबत बसून ऐकू शकता. ही गाणी ऐकल्यानंतर तुमच्या जुन्या आठवणीही ताज्या होतील.

पाहा यादी 

अकेले हम अकेले तुम

हमारे पापा और हम

पापा मेरे पापा

पापा कहते हैं

ओ मेरे पापा

फूल ये कहां से आए

हानिकारक बापू

तसे, कोणत्याही मुलाला वडिलांच्या ऋणातून मुक्त होणे अशक्य आहे. पण हो, त्यांची इच्छा पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. त्यांच्यासाठी सर्वकाही करा ज्यामुळे त्यांना आनंद आणि सुख लाभेल. आम्ही तुम्हा सर्वांना फादर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा देतो