Sunni Ruet Hilal committee ने आज शव्वाल चंद्रकोरीचे दर्शन न झाल्याने मुंबाई मध्ये 25 मे दिवशी Eid-al-Fitr साजरी केली जाणार असल्याची घोषणा केली आहे.
Moon Sighting Committeesच्या चंद्र दर्शनानंतर दिल्या जाणार्या निर्णयाकडे आज भारतातील तमाम मुस्लिम बांधवांचे लक्ष लागले आहे. आज भारतात यंदा रमजान ईद कधी साजरी केली जाणार? याचा निर्णय हिलाल कमिटीकडून दिला जाणार आहे. आज भारतामध्ये 29 वा रमजानचा रोजा आहे. आज चंद्र दर्शन झाल्यास Eid Al-Fitr चा म्हणजेच रमजान ईदचं सेलिब्रेशन उद्या (24 मे) दिवशी होईल. जर चंद्र दर्शन झाले नाही तर 30 दिवसांचा रोजा संपूर्ण करून भारतामध्ये 25 मे, सोमवारी रमजान ईद साजरी केली जाऊ शकते. मग यंदाच्या रमजान ईद बद्दल तुमच्या मनातही उत्सुकता असेल तर मगरीबच्या प्रार्थनेनंतर पहा मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद सह महाराष्ट्रामध्ये 'चांद रात' बाबत हिलाल कमिटी काय निर्णय देते?
भारतामध्ये दिल्ली, हैदराबाद, उत्तरप्रदेश प्रमाणेच आज महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर मध्ये मुस्लिम बांधवांचे संध्याकाळी चंद्र दर्शनाकडे लक्ष असेल. रमजानच्या शेवटच्या जुम्माच्या रात्री सौदी अरेबिया सह अनेक आखाती देशांमध्ये ईदची तारीख ठरवण्यासाठी प्रयत्न केले गेले मात्र त्यांना चंद्र दिसलेला नाही. तेथे 30 दिवसांचा रोजा पूर्ण करून ईद साजरी केली जणार आहे.
सध्या जगभर कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत असल्याने मुस्लिम बांधवांबा यंदा ईदचा सण साध्या पद्धतीने आणि घरातच्याघरातच साजरा करण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचे संकट पाहता यंदा घरीच नमाज अदा करण्यास सांगण्यात आले आहे.
शनिवारी सायंकाळी चांदणे दिसू शकतात आणि रविवारी ईद साजरी केली जावी, अशी घोषणा पाकिस्तानचे विज्ञानमंत्री फवाद चौधरी यांनी केली. खगोलशास्त्रीय आकडेवारीवर आधारित त्यांनी दिलेली सूचना देशातील मुस्लिमांना बंधनकारक नाही कारण ते केंद्रीय रुत-ए-हिलाल समितीचे अध्यक्ष मुफ्ती मुनीब उर रहमान यांच्या अंतिम निर्णयाची वाट पाहतील.