Happy Dussehra 2022 HD Image: दसरा सणानिमित्त आप्तेष्टांना द्या शुभेच्छा; Greetings, Wallpapers, Wishes शेअर करत साजरी करा विजयादशमी
दसरा हा हिंदूंचा महत्त्वाचा सण आहे. हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. हिंदू पंचांगानुसार, अश्विनाच्या महिन्यातील दहाव्या दिवशी दसरा साजरा केला जातो. या दिवशी नागरिक एकमेकांना शुभेच्छा देतात.
Happy Dasara Images in Marathi: दसरा (Dussehra), ज्याला विजयादशमी (Vijayadashami) असेही म्हणतात. दसरा हा हिंदूंचा महत्त्वाचा सण आहे. हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. हिंदू पंचांगानुसार, अश्विनाच्या महिन्यातील दहाव्या दिवशी दसरा साजरा केला जातो. या दिवशी नागरिक एकमेकांना शुभेच्छा देतात. तुम्ही देखील तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत साजरा करणार असाल तर दसरा आणि विजया दशमीच्या शुभेच्छा फेसबूक, ट्विटर, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून HD Images, Wallpaper च्या माध्यमातून शेअर करून त्याची सुरूवात करू शकता. विजयादशमीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास WhatsApp Stickers देखील उपलब्ध आहेत.
भगवान प्रभू रामाची पत्नी सीतेचे अपहरण दहा डोकी असलेल्या रावणाने केले. रावणाच्या कृत्यामुळे चिडलेल्या सीतापत्नी भगवान राम यांनी रावणाशी युद्ध छेडले. या युद्धात दैत्यांचा राजा रावण पराभूत झाला. तव्हापासून दसरा साजरा केला जातो. पुरानात सांगितले जाते की, ‘दसरा’ हा शब्द दस आणि अहार या दोन शब्दांनी बनलेला आहे. ‘दस’ म्हणजे दहा आणि ‘अहार’ म्हणजे दिवस.
प्रमुख आकर्ष असलेली पारंपरीक दसरा ठिकाणे
- बंगालमध्ये दसरा हा विजया दशमी म्हणून ओळखला जातो. जो दुर्गा पूजेचा शेवटचा दिवस आहे.जेव्हा दुर्गा देवी आणि तिच्या चार मुलांच्या मूर्ती विसर्जनासाठी नदीवर नेल्या जातात, तेव्हाचा सोहळा पाहण्यासारखा असतो. (हेही वाचा, Dussehra 2022 : यंदाचा दसरा आणखी खास, तीन शुभ योग आले जुळून, जाणून घ्या, शुभ मुहूर्त)
- राजस्थानमध्ये कोटा येथे दसरा मेळा आयोजित केला जातो. दसऱ्याच्या दिवशी सकाळपासूनच राजवाड्यात धार्मिक कार्यक्रम होतात. मग राजा आणि राजघराण्यातील इतर सदस्य रंगीत मिरवणुकीत जत्रेच्या मैदानात जातात आणि दसरा साजरा करतात.
- हिमाचल प्रदेशमध्ये, हिमाचल प्रदेशातील सर्व प्रमुख देवता कुल्लू शहरात दसरा मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. दसऱ्याच्या दिवशी हा उत्सव सुरू होतो आणि सात दिवस चालतो.
- कर्नाटक राज्यातील म्हैसूरमध्ये हा सण दसरा म्हणून ओळखला जातो. देवी चामुंडेश्वरीने महिषासुराचा पराभव केल्यावर विजयाचा दिवस म्हणून हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी म्हैसूर पॅलेस उजळून निघतो. राजघराण्याकडून देवीची महालात पूजा केल्यानंतर तिची भव्य मिरवणूक काढली जाते.
देशाच्या अनेक भागांमध्ये दसऱ्याचा उत्सव साजरा करण्यासाठी मेळ्यांचे आयोजन केले जाते, देवी चामुंडेश्वरी (माँ दुर्गा) च्या प्रचंड मिरवणुका काढल्या जातात. रामलीलाच्या अंतिम दिवशी रावणाच्या पुतळ्यांचे दहन केले जाते. हिंदू धर्मातील विविध सणांपैकी दसरा एक मुख्य आकर्षण असतो. दसरा हा एक असा सण आहे जो सर्व देवीचा आहे. मात्र, वेगवेगळ्या राज्यांमध्ये तो वेगवेगळ्या पद्धती आणि नावांनीही साजरा होतो. कर्नाटकात दसरा चामुंडीचा, तर बंगालमध्ये दुर्गेचा असतो. दसऱ्याच्या दिवशी रावणाचे दहण केले जाते.