Diwali 2019: दिवाळीनिमित्त काढा ‘या’ खास मेहंदी डिझाईन्स
विशेषत: दिवाळीमध्ये महिला आणि मुलींची स्पेशल तयारी सुरू असते. दिवाळीसाठी कोणता ड्रेस घालायचा? कोणती मेहंदी डिझाईन काढायची? असे अनेक प्रश्न महिलांना पडत असतात. तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत काही खास मेहंदी डिझाईन्स.
दिवाळीचा सण (Diwali 2019) काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. विशेषत: दिवाळीमध्ये महिला आणि मुलींची स्पेशल तयारी सुरू असते. दिवाळीसाठी कोणता ड्रेस घालायचा? कोणती मेहंदी डिझाईन (Mehndi Designs) काढायची? असे अनेक प्रश्न महिलांना पडत असतात. अनेकदा काहींना मेहंदी काढायला वेळ नसल्यामुळे त्या हातावर मेहंदी स्टिकर्स काढतात. परंतु, आज आम्ही तुम्हाला मेहंदीच्या काही सोप्या डिझाईन्स दाखवणार आहोत. त्यामुळे फक्त 10 मिनिटांत तुमचा हात अगदी सुंदर दिसू शकतो. चला तर मग पाहुयात सोप्या आणि अगदी साध्या मेहंदी डिझाईन्स.
दिवाळीनंतर लगेचच दोन दिवसांनंतर भाऊबीजेचा सण येतो. हा दिवशी बहिण आणि भावासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आजकाल राजस्थानी, अरबी, पाकिस्तानी, फ्लोरल, बेल, मोरक्कन मेहंदी डिझाईन्स, बॅकहँड मेहंदी डिझाईन्स, मिनिमलिस्ट मेहंदी डिझाईन्स आदी ट्रेंड सुरू आहेत.
हेही वाचा - Diwali 2019; जाणून घ्या, दिपावलीला लक्ष्मीपूजन ‘कसे’ आणि ‘कोणत्या’ मुहूर्तावर करावे?
हाताच्या मागच्या बाजूने काढायची डिझाईन्स -
स्पेशल मेहंदी डिझाईन्स -
सोपी अरेबियन मेहंदी डिझाईन्स -
स्पेशल कोयरी मेहंदी डिझाईन्स -
वर दिलेल्या मेहंदी डिझाईन्स तुम्ही आपल्या हातावर काढू शकता. या सर्व मेहंदी डिझाईन्स अगदी सोप्या असून तुम्ही त्या केवळ 15 ते 20 मिनिटांत काढू शकता आणि दिवाळीला तुमच्या हाताचे सौंदर्य वाढवू शकता. तसेच तुम्हाला तुमच्या मेहंदीचा रंग अधिक खुलवायचा असेल तर, तुम्ही यासाठी मेहंदी सुकल्यानंतर त्यावर साखर आणि लिंबाचे पाणी लावू शकता. त्यामुळे तुमच्या मेहंदीचा रंग अधिक गडद होईल.