Rangoli Designs For Ambedkar Jayanti 2021: डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशी काढा 'या' सोप्या रांगोळी डिझाइन
नविन कपडे परिधान केले जातात.घरी गोड पदार्थ बनवले जातात.दारासमोर रांगोळी काढली जाते.यंदा देशावर कोरोना व्हायरसचं संकट असल्याने यंदाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (Ambedkar Jayanti)ही घरगुती स्वरूपात साजरी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.त्यामुळे आपल्याला घराबाहेर बाहेर जाऊन हा उत्सव साजरा करता येणार नाही.
Ambedkar Jayanti Rangoli Designs: संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येत्या 14 एप्रिल रोजी आहे.डॉ. आंबेडकरांची जयंती ही केवळ जयंती असत नाही. उत्सवच असतो तो. दरवर्षी 14 एप्रिल दिवशी भीम अनुयायी त्यांच्या जन्म दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करतात. त्यांच्या कार्याचा वसा यशाशक्ती पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. या दिवशी भीम अनुयायांच्या घरी दीवाळीच साजरी केली जाते. नविन कपडे परिधान केले जातात.घरी गोड पदार्थ बनवले जातात.दारासमोर रांगोळी काढली जाते.यंदा देशावर कोरोना व्हायरसचं संकट असल्याने यंदाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (Ambedkar Jayanti)ही घरगुती स्वरूपात साजरी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.त्यामुळे आपल्याला घराबाहेर बाहेर जाऊन हा उत्सव साजरा करता येणार नाही. मात्र घरी बाबासाहेबांना घरीच वंदन करून दारासमोर रांगोळी काढून तुम्ही हा उत्सव साजरा करू शकता. आज आपण पाहूयात डॉ. आंबेडकरांची जयंतीला काढता येतील अशा सोप्या रांगोळी डिझाईन्स. (Dr Babasaheb Ambedkar's 130th Birth Anniversary: घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन; चैत्यभूमी येथील स्मारकस्थळावरून होणार थेट प्रक्षेपण )
पिंपळाच्या पानाची रांगोळी
ठिपक्यांची रांगोळी डिझाइन
सोपी रांगोळी डिझाईन्स
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पोट्रेट रांगोळी डिझाइन
संविधान पुस्तक रांगोळी डिझाइन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली मध्य प्रदेशातील महू येथे झाला. दलित, अस्पृश्य समाजातील लोकांना त्यांचे न्याय वा हक्क मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोलाची कामगिरी केली आहे. 2017 सालपासून महाराष्ट्रामध्ये 14 एप्रिल हा दिवस ‘ज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो.