Kartik Purnima 2019: कार्तिक पौर्णिमेचे महत्व व धनप्राप्तीचे 'हे' उपाय तुम्हाला माहित आहेत का?
या राक्षसाच्या वधानंतरच भगवान श्री शंकर हे त्रिपुरारी नावाने प्रसिद्ध झाले. कार्तिक पौर्णिमेस कार्तिक पूजेचे सुद्धा महत्व आहे.
Kartik Purnima 2019: हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचे खास महत्व असते. ज्याप्रमाणे कोजागिरी पौर्णिमेला महत्त्व असते, त्याचप्रमाणे कार्तिक पौर्णिमेलाही (Kartik Purnima 2019) तितकेच महत्त्व असते. या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान पुण्य करण्याचे व सत्यनारायण पूजा करून त्याची कथा ऐकणे याला विशेष महत्त्व आहे.
कार्तिक मासात येणाऱ्या पौर्णिमेच्या तिथीला 'त्रिपुरारी पौर्णिमा', (Tripurari Purnima) असेही संबोधले जाते. ही त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे दिवाळी सणाचा उत्तरार्ध असते. या पौर्णिमेला कार्तिक पौर्णिमा, असे म्हणतात. याच दिवशी देवदिवाळी (Dev Diwali) हा सण देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. (हेही वाचा - Kartik Purnima 2019 : त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे काय? जाणून घ्या याच दिवशी का साजरी केली जाते 'देवदिवाळी'?)
कार्तिक पौर्णिमेचे महत्त्व -
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुर नावाच्या एका महाभयानक राक्षसाचा वध केला होता. या राक्षसाच्या वधानंतरच भगवान श्री शंकर हे त्रिपुरारी नावाने प्रसिद्ध झाले. कार्तिक पौर्णिमेस कार्तिक पूजेचे सुद्धा महत्व आहे. ते सहा कृत्तिकांचे प्रिय पुत्र होते, असं म्हटलं जातं. शिवा, संभूती, संतती, प्रीती, अनुसया व क्षमा नावाच्या कृत्तिकांचे कार्तिक पौर्णिमेस पूजन केल्याने भगवान शंकर व त्यांच्या परिवाराची कृपा आपल्यावर राहते. या दिवशी भगवान शंकर, पार्वती आणि कार्तिकेय व श्रीगणेशाची पूजा करावी, असे केल्यास घरात सुख, शांती आणि समृध्दी नांदते.
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चंद्र सामान्य आकाराहून अधिक मोठा दिसतो. ज्योतिष शास्त्रात चंद्र हा मनाचा कारक ग्रह समजला जातो. माता लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी या दिवशी भगवान विष्णुसह माता लक्ष्मी देवीची पूजा करावी. त्यामुळे धनलाभ होण्यास मदत होते.
कार्तिक पौर्णिमेला 'हे' कार्य केल्यास होईल धनलाभ -
- कार्तिक पौर्णिमेस भगवान शंकरासह माता पार्वती व कार्तिकेय यांची पूजा अवश्य करावी. हा दिवस कार्तिकेयाचा जन्म दिवस असल्याचे मानण्यात येते.
- कार्तिक पौर्णिमेस सत्यनारायणाची पूजा करा, असे केल्याने आपल्या घरात सुख, शांत आणि समृद्धी नांदेल.
- पौर्णिमेच्या दिवशी गरिबास पांढऱ्या वस्त्रासह दूध, मिठाई व तांदूळ यांचे दान करा. त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते.
- लक्ष्मीसह चंद्रास तांदळाच्या खीरीचा नैवेद्य दाखविल्याने माता लक्ष्मी कृपा आपल्यावर राहण्यास मदत होते.
- या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करा.
- या दिवशी देव दिवाळीही साजरी केली जाते. तुम्ही दिवाळीत जसे घर सजवता अगदी तसेच या दिवशीदेखील सजवा, असे केल्यास मात लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल आणि तुम्हाला कधीही पैशांची कमी भासणार नाही.
यंदा 12 नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमा साजरी होणार आहे. त्यामुळे तुम्हालाही लक्ष्मी मातेला प्रसन्न करायचे असेल तर, वर दिलेले कार्य करून तुम्ही धनप्राप्ती करू शकता. (सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास सल्ला समजू नये. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)