Diwali Padwa 2021 HD Image: दिवाळी पाडव्याच्या मराठमोळ्या शुभेच्छा देण्यासाठी खास SMS, Greetings, Images, Whatsapp Messages, शुभेच्छापत्रं

आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी हा दिवस नव्या वर्षाची सुरुवात मानतात. अशा शुभ दिनी तुमच्या आप्तेष्टान्ना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आणले आहेत हे खास मेसेजेस.

Diwali Padwa 2021 HD Image ( File Photo)

दिवाळीत येणारी कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दीपावलीचा तिसरा दिवस असतो. हिंदू धर्मीयांचा हा एक मोठा सण आहे. या दिवसाला दिवाळी पाडवा म्हणतात.यंदा दिवाळी पाडवा 5 नोव्हेंबरला येत आहे. या दिवशी विष्णूने वामन बटूचे रूप घेऊन अनाठायी औदार्य दाखवणाऱ्या उदार बळीला कट करून जमिनीत म्हणजे पाताळात गाडले! बळीला पाताळाचे राज्य देऊन विष्णूने त्याच्या राज्याच्या द्वारपालाचे काम स्वीकारले.घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी देतो. नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच दिवाळसण म्हणतात. त्यानिमित्त या दिवशी जावयाला आहेर केला जातो.

दिवाळीतला पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी हा दिवस नव्या वर्षाची सुरुवात मानतात. अशा शुभ दिनी तुमच्या आप्तेष्टान्ना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आणले आहेत हे खास मेसेजेस.

Diwali Padwa 2021 HD Image ( File Photo)
Diwali Padwa 2021 HD Image ( File Photo)
Diwali Padwa 2021 HD Image ( File Photo)
Diwali Padwa 2021 HD Image ( File Photo)

उत्तर भारतात या दिवशी गोवर्धन पूजा असते. श्रीकृष्णाच्या किंवा विष्णूच्या देवळात ही पूजा होते. या दिवशी देवाला अनेक पक्वान्नांचा आणि मिठायांचा डोंगर अर्पण केला जातो. म्हणून या सणाला अन्नकूट असेही म्हणतात.