Diwali Diet Tips: चकली, शंकरपाळी सारख्या तळणीच्या पदार्थांमध्ये कराल 'हे' बदल तर 'डाएट' चं गणित विसरून घेऊ शकाल फराळाचा आस्वाद
मात्र अशा फराळात मूळ पदार्थांची चव कमी झालेली असते. चकली, करंजी, लाडू आणि शंकरपाळी हे महत्त्वाचे पदार्थ बनवताना या गोष्टींचा वापर केला तर तुमचे मूळ पदार्थाची चवही बदलणार नाही आणि फराळाचा आस्वादही घेता येईल.
दिवाळीचा फराळ म्हणजे खवय्यांसाठी पर्वणीच असते. त्यामुळे वर्षातून येणा-या या महत्त्वाच्या सणाची सर्व खवय्ये आतुरतेने वाट पाहत असतात असं म्हणायला हरकत नाही. दिवाळीत (Diwali) बनवले जाणारे चकल्या, लाडू, करंज्या, शंकरपाळ्या, चिवडा हे फराळातील महत्त्वाचे पदार्थ. तेला-तुपात तळलेल्या या चमचमीत पदार्थांमुळे तुमच्या डाएटचा मात्र चांगलाच बटट्याबोळ होतो. वर्षातून एकदाच हा सण येत असल्यामुळे लोक आपले डाएट विसरुन या फराळावर ताव मारतात मात्र त्याचा परिणाम दिवाळीनंतर दिसायला सुरुवात होते. अनेकांना ब-याच आजारांना सामोरे जावे लागते. तसेच शरीरातील फॅट्स वाढल्याने वजन वाढते ते वेगळेच. म्हणूनच अशा वेळी अनेकांना डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे फराळाचा नीट आस्वाद घेता येत नाही. अशा खवय्यांच्या आनंदावर विरजण पडू नये म्हणून आम्ही तुम्हाला काही फायदेशीर अशा टिप्स सांगणार आहोत.
दिवाळीत फराळ खाता यावा आणि आपले डाएटही मोडू नये म्हणून बरेच जण बाहेरून डाएट फराळ विकत आणतात. मात्र अशा फराळात मूळ पदार्थांची चव कमी झालेली असते. चकली, करंजी, लाडू आणि शंकरपाळी हे महत्त्वाचे पदार्थ बनवताना या गोष्टींचा वापर केला तर तुमचे मूळ पदार्थाची चवही बदलणार नाही आणि फराळाचा आस्वादही घेता येईल.
हेदेखील वाचा- दिवाळी मध्ये केवळ नरक चतुर्दशी दिवशी नव्हे तर नियमित अभ्यंग स्नान करण्याचे आहेत '7' आरोग्यदायी फायदे!
फराळातील तीन महत्त्वाच्या टिप्स:
1. लाडू बनवताना त्यात साखरेऐवजी गूळ, खजूर किंवा फळांच्या गराचा वापर केल्यास शरीरातील फॅट्स वाढत नाही. तसेच गूळ, खजूर आणि फळांचा गर हा पौष्टिक आहार असल्यामुळे आपले वजन नियंत्रित राहते आणि शरीरावर त्याचा विपरित परिणामही होत नाही.
2. करंजी, चकली तेलात तळण्याऐवजी त्या बेक कराव्यात. यामुळे त्याच्या चवीत फारसा फरक पडत नाही. तसेच तेलाचं सेवन कमी झाल्यामुळे आपले कोलेस्टेरॉल देखील वाढत नाही.
3. शंकरपाळ्यांमध्ये मैद्यासोबत थोडा रवा घातला तर शंकरपाळ्या खुसखुशीत होतात. तसेच त्या शरीरासाठी पौष्टिकही असतात.
दिवाळी ही सर्वांचीच असते. त्यामुळे अगदी लहानग्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांना ती साजरी करता यावी त्याचा आनंद घेता यावा हाच प्रत्येकाचा उद्देश असतो. त्यामुळे अगदी फटाक्यांसारखा फराळाचा देखील आनंद घेता यावा यासाठी या टिप्स तुम्हाला नक्की कामी येतील.