Happy Diwali 2022 HD Images: दिवाळी निमित्त शुभेच्छा देण्यासाठी HD Images, Wallpapers, Greetings, साजरा करा दिव्यांचा सण

अगदी लहान थोर दिवाळीला आनंदून गेले असतात. सर्वत्र गोडधोड पदार्थ आणि मिठाईची रेलचेल असते. दीपावली (Diwali 2022 HD Images) निमित्त अशात फटाक्यांची आतशबाजीही सुरु असते. अर्थात अलीकडील काही वर्षांमध्ये पर्यावरणाबद्दल जागृती झाल्याने फटाके फोडण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

Diwali | File Image

Happy Diwali Images in Marathi: दिवाळी (Diwali 2022) म्हणजे एक आनंदाचा दिव्यांचा उत्सव. अगदी लहान थोर दिवाळीला आनंदून गेले असतात. सर्वत्र गोडधोड पदार्थ आणि मिठाईची रेलचेल असते. दीपावली (Diwali 2022 HD Images) निमित्त अशात फटाक्यांची आतशबाजीही सुरु असते. अर्थात अलीकडील काही वर्षांमध्ये पर्यावरणाबद्दल जागृती झाल्याने फटाके फोडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तरीही लोक आनंदात असल्याने मोठ्या प्रमाणावर फटाके वाजवले जातातच. अशा या आनंदाच्या प्रसंगी एकमेकांना शुभेच्छाही दिल्या जातात. आपणही डिजिटल युगात मोबाईलच्या माध्यमातून Whatsapp, Facebook, Instagram आणि ट्विटर अशा मंचावरुन एकमेकांना शुभेच्छा देऊ शकता. त्यासाठी आम्ही येथे काही HD Images, Greetings देत आहोत. जे आपम एकमेकांना शुभेच्छा देताना नक्की वापरु शकता.

दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी लोक देवी लक्ष्मीची पूजा करतात. मातीचे दिवे लावतात. एकमेकांना मिठाई वाटतात. घरीही गोडधोडाचे पदार्थ बनवले जातात.

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. त्यामुळे भारतात प्रत्येक सण हा वेगवेळ्या नावांनी ओळखला जातो. तसेच, तो साजरा करण्याची पद्धतही वेगवेगळी असते. यात समना दुवा असा की हे सण शक्यतो देशभर एकाच दिवशी किंवा अपवादात्मक स्थितीत नजिकच्या काळातच (शक्यतो एक दोन दिवसांच्या फरकाने) साजरे होतात. (हेही वाचा, Dhanteras 2022 Dates: महाराष्ट्रात धनतेरस 22 ऑक्टोबरला कुठे आणि 23 ऑक्टोबरला कुठे साजरी केली जाणार?)

आपण सर्वजण महाराष्ट्राचे रहिवासी असल्यामुळे आपल्याकडे दिवाळी सण कसा साजरा होतो हे आपण जाणतात. पण, महाराष्ट्राचे शेजारी राज्य गोव्यात आपण दिवाळी सण कसा साजरा करतात जाणता का? गोव्यात दिवाळीनिमित्त कृष्णाची पूजा केली जाते. गोव्यातील स्थानिक नागरिक दिवाळीनिमित्त राक्षस नरकासुरावर भगवान श्रीकृष्णाने विजय मिळवल्याबद्दल विजय साजरा करतात. या वेळी लोक एकमेकांना मिठाई वाटतात.

तामिळनाडू राज्यात दिवाळी नरक चतुर्दशीदिवशी मोठ्या प्रमाणावर साजरी होते. या दिवशी सुर्योदयापूर्वी अंगाला तेल लावून अंघोळ केली जाते. तामळ लोक या दिवशी 'कुथु विलाकु' म्हणजे दिवे प्रज्वलीत करतात. देवी-देवतांना नैव्यद्यही चढवला जातो.

ओडिशा राज्यात दिवाळी हा एक वेगळाच उत्सव असतो. या दिवशी या राज्यातील लोक आपल्या पूर्वजांचे स्वागत करतात. त्यांच्या आठवणीत दीप प्रज्ज्वलीत करतात. त्यांची अशी धारणा असते की, दिवाळी दिवशी आपले पूर्वज स्वर्गातून खाली आलेले असतात. एकूणच काय तर देशभरात आनंदाचा वातावरण असते.