Diwali 2018 : भाऊबीज दिवशी कोणत्या मुहूर्तावर ओवाळणी करणं अधिक शुभ ठरेल ? ओवाळणीच्या ताटात काय काय असायला हवेच ?
बहीण भावाच्या प्रेमाचं प्रतीक असणारा भाऊबीज हा सण नेमका कसा आणि कोणत्या वेळेत साजरा करावा
कार्तिक शुक्ल द्वितीयेला भाऊबीज हा सण साजरा केला जातो. या दिवशी बहीण भावाला ओवाळते. बहीण भावाचं नातं उदंड राहावं याकरिता प्रार्थना केली जाते. दिवाळीचा पाचवा आणि सेलिब्रेशनचा हा अंतिम दिवस असतो. त्यामुळे घरा- घरात मोठ्या उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण असतं. बहिणीकडे भावाला बोलावून त्याच्यासाठी गोडाधोडाच्या जेवणाचा बेत केला जातो. बहीण भावाच्या प्रेमाचं प्रतीक असणारा हा सण नेमका कसा . आणि कोणत्या वेळेत साजरा करावा हा प्रश्न तुम्हांला पडला असेल तर पहा भाऊबीज २०१८ सेलिब्रेशनचा शुभ मुहूर्ताच्या वेळा भाऊबीजेच्या दिवशी बहिण भावाला का ओवाळते ?
कशी साजरी कराल भाऊबीज ?
भाऊबीज हा मोठा उत्साहाचा सण असतो. यादिवशी बहिणीने भावाला ओवाळाचे असते. याकरिता ताटामध्ये दिवा, कुंकू, अक्षता, सोन्याची अंगठी, कापूस, नारळ आणि गोडाचा पदार्थ ठेवा. प्रथम भावाच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावा. त्यावर अक्षता लावा. कापूस आणि अंगठी भावाच्या डोक्यावर ठेवा. दिव्याचं ताट भावाच्या चेहऱ्यासमोर किमान तीन वेळेस फिरवा. त्यानंतर गोडाचा पदार्थ भारावून भावाचा आशीर्वाद घ्यावा. ओवाळणी झाल्यानंतर बहीण - भाऊ एकमेकांना प्रेमाची वस्तू भेट म्हणून देतात. भाऊबीजेला बहिणीला खुश करण्यासाठी ओवाळणी म्हणून देऊ शकता या काही हटके गोष्टी
भाऊबीज साजरी करण्याचा मुहूर्त ?
सकाळी - 06.39 ते 10.43 वाजे पर्यंत
दुपारी - 12.04 ते 01.26 वाजे पर्यंत
संध्याकाळी - 04.09 ते 05.30 वाजे पर्यंत
रात्री - 08.47 ते 10.26 वाजे पर्यंत
द्वितीया तिथी प्रारंभ- 8 नोव्हेंबर , रात्री 09.07 वाजल्यापासून
द्वितीया तिथी समाप्त- 9 नोव्हेंबर, रात्री 09.20 वाजल्यापासून
आजकाल व्यस्त जीवनशैलीमुळे प्रत्येक वेळेस कुटुंबियांना वेळ देता येतोच असे नाही. त्यामुळे किमान सणाच्या दिवशी घरातील व्यक्तींसाठी काही वेळ राखून ठेवा. तुमचा भाऊ तुमच्यासोबत नसल्यास चंद्राला भाऊ समजून त्याला ओवाळलं जातं.