Datta Jayanti 2021 Messages: दत्त जयंती निमित्त खास मराठी Wishes, HD Images, Wallpapers पाठवून द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा

दत्त जयंतीच्या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच गुरुचरित्रसप्ताह असे म्हणतात.

Datta Jayanti 2021 Messages (File Image)

भारतामध्ये मकर संक्रांतीपासून सण-उत्सवाला सुरुवात होते व त्याची सांगता होते ती दत्त जयंतीला (Datta Jayanti 2021). मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो. यंदा 18 डिसेंबर, शनिवारी दत्त जयंती साजरी होणार आहे. परब्रह्ममुर्ती सद्गुरु, श्रीगुरू देव दत्त, गुरू दत्तात्रेय, दत्त भगवान अशा अनेक नावांनी महाराष्ट्रात दत्ताची पूजा होते. दत्तात्रेय किंवा दत्त हे अत्री ऋषी व माता अनसूया यांचे पुत्र होत. तीन तोंडे, सहा हात, दोन पाय, चतुर्वेददर्शक चार श्वान व जवळ कामधेनू (गोमाता) असलेले श्रीदत्तगुरू हे ब्रह्मा, विष्णु, महेश यांचे एकस्वरूप आहे.

दत्त जयंती दिवशी दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने अधिक कार्यरत असते, त्यामुळे या दिवशीच्या पूजेला आणि उपासनेला विशेष महत्व आहे. तर यंदा दत्त जयंतीनिमित्त तुम्ही खास मराठी Wallpapers, Messages, Images, Greetings, HD Images पाठवून शुभेच्छा देऊ शकता.

Datta Jayanti 2021 Messages
Datta Jayanti 2021 Messages
Datta Jayanti 2021 Messages
Datta Jayanti 2021 Messages
Datta Jayanti 2021 Messages
Datta Jayanti 2021 Messages

दरम्यान, दत्तात्रय हा शब्द 'दत्त' व 'आत्रेय' अशा दोन शब्दांनी बनला आहे. 'दत्त' या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत, मुक्‍तच आहोत, आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा आणि 'अत्रेय' म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा. 'श्रीपाद श्रीवल्लभ' हा दत्ताचा पहिला अवतार, 'श्री नृसिंह सरस्वती' हा दुसरा तर 'स्वामी समर्थ  हा तिसरा अवतार आहे.

श्रीगुरुदेव दत्त हे हिंदू धर्मातील पहिले गुरू समजले जातात. दत्त जयंतीच्या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच गुरुचरित्रसप्ताह असे म्हणतात. महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व आहे.

Tags

Datta Jayanti Datta Jayanti 2021 Datta Jayanti 2021 greetings Datta Jayanti 2021 HD Images Datta Jayanti Date 2021 Datta Jayanti Facebook Post Datta Jayanti marathi wishes Datta Jayanti Messages Datta Jayanti Messages in Marathi Datta Jayanti puja vidhi Datta Jayanti WhatsApp Status Datta Jayanti Wishes Datta Jayanti Wishes in Marathi Dattatreya Jayanti Dattatreya Jayanti 2021 Jayanti दत्त जयंती दत्त जयंती 2021 दत्त जयंती 2021 मराठी शुभेच्छा संदेश दत्त जयंती 2021 मेसेजेस दत्त जयंती 2021 विशेस दत्त जयंती एचडी इमेजेस दत्त जयंती कथा दत्त जयंती तारीख 2021 दत्त जयंती पुजा शुभ मुहूर्त दत्त जयंती फेसबुक पोस्ट दत्त जयंती मराठी शुभेच्छा दत्त जयंती मेसेज दत्त जयंती व्हॉट्सअॅप स्टेटस दत्त जयंती शुभ मुहूर्त दत्त जयंती शुभेच्छा दत्त जयंती शुभेच्छापत्रं दत्त पौर्णिमा दत्त पौर्णिमा प्रारंभ दत्तात्रेय जयंती 2021 दत्तात्रेय जयंती एचडी इमेज सण आणि उत्सव


00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif