Datta Jayanti 2020 Date: दत्त जयंती यंदा 29 डिसेंबर दिवशी; जाणून घ्या तिथी तारीख, वेळ
त्यामुळे दत्तात्रेयाची उपासना ही उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीन शक्तीची उपसना असं मानलं जातं.
Datta Jayanti 2020 Tithi Date and Time: मार्गशीर्ष महिना सुरू झाला की व्रत वैकल्यांचा, धार्मिक सणांचा काळ सुरू होतो. मार्गशीर्ष पौर्णिमा ही दत्त जयंती (Datta Jayanti) म्हणून साजरी केली जाते. यंदा दत्त जयंती ग्रेगेरियन कॅलेंडर नुसार, मंगळवार, 29 डिसेंबर 2020 दिवशी आहे. भगवान विष्णूच्या 24 अवतारांपैकी दत्तात्रेय (Dattatreya) हा एक अवतार आहे. महाराष्ट्रभरात दत्त जयंती निमित्त भाविक दत्त मंदिरामध्ये मोठी गर्दी करतात. औदुंबर हे दत्ताचे आवडते वृक्ष असल्याने त्याच्या सान्निध्यामध्ये या दिवशी गुरू चरित्राचे पारायण करण्याची प्रथा आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध दत्तक्षेत्र गाणगापूर, नरसोबाची वाडी, माहूरगड कशी आणि कुठे आहेत?
पुराणांमध्ये दत्ताच्या जन्माविषयी एक कथा सांगितली आहे. त्यानुसार दत्तात्रेय हे अत्री ऋषी आणि अनुसया यांचा पुत्र असल्याचं सांगितलं आहे. दत्तात्रयाला सृष्टीचे रचनाकार ब्रम्हदेव, पालनकर्ते विष्णू आणि लय करणारे भगवान शंकर यांच्या रूपात महेश यांचं स्वरूप मानलं जातं. त्यामुळे दत्तात्रेयाची उपासना ही उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीन शक्तीची उपसना असं मानलं जातं. December 2020 Festivals, Events and Holiday Calendar: महापरिनिर्वाण दिन ते महालक्ष्मी गुरूवार व्रत, नाताळ यंदा कधी?
दत्त जयंती तारीख वेळ
दत्त जयंती तारीख - 29 डिसेंबर 2020
दत्त जयंती तिथी वेळ - 29 डिसेंबरला दत्त जयंती सकाळी 7 वाजून 54 मिनिटांनी सुरू होणार असून 30 डिसेंबरला त्याची सांगता 8 वाजून 57 मिनिटांनी होणार आहे.
पौराणिक कथेनुसार एकदा पार्वती, लक्ष्मी माता आणि सावित्री या तिन्ही देवतांना आपल्या पतिव्रत धर्मावर अहंकार होता. जेव्हा नारद मुनींना हे समजलं तेव्हा त्यांनी त्यांची परीक्षा घेण्यासाठी दत्तात्रेयाची निर्मिती केली असे कथांमधून सांगितले जाते. महाराष्ट्रात माहुर, औंदुबर, गाणगापूर, नृसिंहवाडी, कुरवपूर या ठिकाणी दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या उत्सहामध्ये साजरा केला जातो.