Datta Jayanti 2019: दत्त जयंती यंदा 11 डिसेंबर दिवशी; जाणून घ्या दत्तात्रेय जयंतीचं महत्त्व, पूजा वेळ काय?

दत्त जयंती दिवशी दत्तात्रयाची पूजा केली जाते. पौराणिक कथा आणि मान्यतांनुसार मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाळात भगवान दत्तात्रेयाचा जन्म झाला होता.

Datta Jayanti 2019 | Photo Credits: Instagram

Dattatreya Jayanti 2019:  दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला दत्त जयंती (Datta Jayanti) साजरी करण्याची प्रथा आहे. यंदा दत्त जयंती 11 डिसेंबर दिवशी साजरी केली जाणार आहे. दत्त जयंती दिवशी दत्तात्रयाची पूजा केली जाते. पौराणिक कथा आणि मान्यतांनुसार मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाळात भगवान दत्तात्रेयाचा जन्म झाला होता. दत्तात्रयाला सृष्टीचे रचनाकार ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचं स्वरूप मानलं जातं. असं म्हटलं जातं की दत्तात्रेयामध्ये गुरू आणि देवता या दोघांचाही मिलाफ असल्याने त्यांना गुरूदेव दत्त म्हणूनही संबोधलं जातं. महाराष्ट्रात माहुर, औंदुबर, गाणगापूर, नृसिंहवाडी, कुरवपूर या ठिकाणी दत्त जयंतीचा विशेष उत्सव साजरा केला जातो.  महाराष्ट्रातील प्रसिद्ध दत्तक्षेत्र गाणगापूर, नरसोबाची वाडी, माहूरगड कशी आणि कुठे आहेत?

पुराणातील कथांनुसार, भगावान दत्तात्रय हे अतिशय विद्वान होते. त्यांनी 24 गुरूंकडून शिक्षणाची दीक्षा घेतली होती. त्यांच्या नावावरूनच दत्त संप्रादयाची सुरूवात झाली. अनेक भाविक मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण दिवस व्रत आणि उपवास ठेवतात. दत्त मंदिरात जाऊन दत्तात्रयाची पूजा करतात. त्यांच्या या व्रताने मनोकामना पूर्ण होतात असादेखील काहींचा विश्वास आहे.

दत्त जयंती पूजा मुहूर्त

दत्ता जयंती तारीख : 11 डिसेंबर 2019

विधी वेळ: मार्गशीर्ष पौर्णिमेची सुरूवात 11 डिसेंबर दिवशी 10.58 वाजता सुरू होणार आहे तर ही पौर्णिमा 12 डिसेंबर दिवशी 10.42 ला संपणार आहे.

हिंदू मान्यतांनुसार, भगवान दत्तात्रेय हे ब्रम्हा, विष्णू आणि महेश या तिघांचा अंश असलेले अवतार आहेत. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला त्यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. त्यांच्या बालरूपाची देखील पूजा केली जाते. पौराणिक कथेनुसार एकदा पार्वती, लक्ष्मी माता आणि सावित्री या तिन्ही देवतांना आपल्या पतिव्रत धर्मावर अहंकार होता. जेव्हा नारद मुनींना हे समजलं तेव्हा त्यांनी त्यांची परीक्षा घेण्यासाठी दत्तात्रेयाची निर्मिती केली.