Chocolate Day 2019: 'या' 5 मुख्य कारणांमुळे मुलींना चॉकलेट खाणे खुप आवडते

या व्हेलेंटाईन वीक मधील तिसरा दिवस चॉकलेट डे (Chocolate Day) साजरा केला जातो. या दिवशी प्रियकर-प्रेयसी एकमेकांना चॉकलेट देऊन आपले एकमेकांवरील प्रेम व्यक्त करतात.

Chocolate Day 2019 (Photo Credits-Twitter)

Valentine’s Day 2019: व्हेलेंटाईन डे (Valentine Day)  जवळ येत असून सर्व प्रेमीयुगलुक या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या दिवशी प्रियकर-प्रेयसी एकमेकांच्या मनातील भावना व्यक्त करत प्रेमाचा स्विकार करतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मनात प्रिय व्यक्तीबद्दल आपुलकी आणि प्रेम व्यक्त व्हायला सुरुवात होते. जगात सर्वत्र व्हेलेंटाईन डे साजरा केला जातो. या व्हेलेंटाईन वीक मधील तिसरा दिवस चॉकलेट डे (Chocolate Day) साजरा केला जातो. या दिवशी प्रियकर-प्रेयसी एकमेकांना चॉकलेट देऊन आपले एकमेकांवरील प्रेम व्यक्त करतात.

सर्वात जास्त असे पाहायला मिळाले आहे की, चॉकलेट डे मुळे मुलांच्या तुलनेत मुली खुप उत्साही असतात. कारण मुलींना चॉकलेट हे अत्यंत आवडत असल्याने त्यांच्यामध्ये चॉकलेट डे च्या निमित्ताने खुप उत्साह, आनंद दिसून येतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगत आहोत 'या' 5 मुख्य कारणांमुळे का मुलींना चॉकलेट खायला आवडते. (हेही वाचा-Happy Chocolate Day 2019: हॅपी चॉकलेट डे' च्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी Facebook, WhatsApp Status, SMS, Greetings)

1. सर्वेक्षणानुसार, मुलांच्या तुलनेत मुलींना जास्त तणावाखाली असतात. असे सांगितले जाते की, चॉकलेट खाण्याने तणावाचे प्रमाण थोडे हलके होते. त्यामुळे मुलींना चॉकलेट खाणे खुप आवडते.

2. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुलींच्या हार्मोनल लेव्हलमध्ये सातत्याने बदल होत असतो. त्यामुळे हार्मोनल लेव्हल संतुलित राखण्यासाठी चॉकलेट हा मुख्य घटक ठरतो.

3. काही मुलींना चॉकलेटचे रंग आकर्षित करतात.

4. असे सांगितले जाते की, मुलींना चॉकलेटच्या रंगासोबत त्याच्या आकारही आकर्षित करतो.

5. चॉकलेट खाल्ल्याने भुक वाढते. त्यामुळे चॉकलेटची टेस्ट भुक वाढवण्यासाठी मदत करते. म्हणून मुलींना चॉकलेट खाणे फार आवडते.

तुम्हाला सुद्धा तुमच्या प्रेयसीला चॉकलेट डे च्या दिवशी खास सरप्राईज द्यायचे असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा. तसेच आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील चॉकलेटच्या चवीसारखा गोड जाईल याचा प्रयत्न करा.