Happy Chocolate Day 2019: हॅपी चॉकलेट डे' च्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी Facebook, WhatsApp Status, SMS, Greetings
व्हेलेंटाईनचा तिसरा दिवस म्हणजेच चॉकलेट डे (9 फेब्रुवारी) साजरा केला जातो. या दिवशी प्रियकर-प्रेयसी एकमेकांना चॉकलेट देऊन प्रेमाचा स्विकार करतात आणि त्याचसोबत चॉकलेट डेच्या शुभेच्छा ही देतात.
Valentine’s Day 2019: आपल्या देशात खुप असे सणउत्सव साजरे केले जातात. परंतु प्रेमीयुगलुकांसाठी व्हेलेंटाईन डे हा एका मोठ्या उत्सावासारखाच असतो. तर व्हेलेंटाईन वीक सुरु होताच आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठी विविध युक्तीवाद तरुण-तरुणींपासून ते मोठ्या व्यक्तींतर्फे केला जातो. व्हेलेंटाईनचा तिसरा दिवस म्हणजेच चॉकलेट डे (9 फेब्रुवारी) साजरा केला जातो. या दिवशी प्रियकर-प्रेयसी एकमेकांना चॉकलेट देऊन प्रेमाचा स्विकार करतात आणि त्याचसोबत चॉकलेट डेच्या शुभेच्छा ही देतात.
या दिवशी काही लोक आपल्या मित्रांना किंवा पार्टनरला चॉकलेट देऊन आनंद व्यक्त करतात. त्याचसोबत कपल्स एकमेकांना प्रेमाने भरलेले मेसेजेस पाठवतात. त्यामुळे यंदाचा चॉकलेट डे तुमच्यासाठी गोड असू दे त्याचासाठी आम्ही तुमच्यासाठी खास चॉकलेट डे मेसेजेस घेऊन आलो आहोत. ते तुम्ही WhatsApp, SMS आणि Facebook Greeting च्या माध्यमातून पाठवू शकता.(हेही वाचा-Happy Propose Day 2019: प्रपोज डे' च्या दिवशी प्रियकराला सांगायची मनातील बात, पण भीती वाटते तर 'या' आयडिया वापरा)
हॅपी चॉकलेट डे मेसेज आणि ग्रीटिंग्ज-
‘Kit-Kat’ चा स्वाद आहेस तू..
‘Dairy Milk’ सारखी स्वीट आहेस तू..
‘Cadbury’ पेक्षाही खास आहेस तू..
काहीही असो माझ्यासाठी,
‘Five Star’ आहेस तू…
Happy Chocolate Day 2019!

हृदय तुझे,
एका गोड चॉकलेट सारखे नाजुक,
त्यात तु एका ड्राय फ्रुटचा तडका
तुच आहेस माझ्या दिलाचा तुकडा
Happy Chocolate Day 2019!

असे वाटते एका स्वप्नासारखी संध्याकाळ आली,
पाहिले तर तु निखळ हसत होतीस,
ज्यात तू एका चॉकलेटसारखी गोड वाटत होतीस,
या वातावरणात गोड प्रेमाचे गाणे गुणगुणत होतीस
Happy Chocolate Day 2019!

मला हाक न मारता मी तुझ्या समोर येईन,
वचन दे असे की मैत्री तु सुद्धा निभावशील,
परंतु असे नाही फक्त रोज आठवण काढशील,
फक्त लक्षात ठेव जेव्हा तु एकट्यात Dairmailk खाशील
Happy Chocolate Day 2019!

गोड व्यक्तीसारखी तु नेहमी माझ्या जवळी रहा,
आयुष्यात साथ दे अशी की आजन्म मधूर गाणे गात रहा,
कधी होतील चुका माझ्या कडून किंवा तुझ्या कडून ही,
तरही आयुष्यभर चॉकलेट सारखी माझीपाशीच रहा
Happy Chocolate Day 2019!

Happy Chocolate Day WhatsApp Status
Happy Chocolate Day 2019 GIF Images
तुमच्या पार्टनरला चॉकलेट गिफ्ट करुन तुमच्या नात्यात गोडवा आणा. तसेच वरील दिलेले मेसेजेस तुमच्या पार्टनरला पाठवलात तर तुमच्यासाठी हा दिवस खुप खास ठरेल.
(The above story first appeared on LatestLY on Feb 08, 2019 04:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

