Chaitra Navratri 2019 Ghatasthapana: चैत्र नवरात्री मध्ये पहिल्या दिवशी घटस्थापना कधी, कशी कराल?

हे घट मातीचे असून त्याला सृष्टीचे रुप मानले जाते.

Chaitra Navratri 2019 (Photo Credits: File Photo)

Chaitra Navratri Kalash Sthapana Timings and Puja Vidhi: शारदीय नवरात्रीप्रमाणे महाराष्ट्रासह देशामध्ये चैत्र नवरात्रीचा (Chaitra Navratri)  उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. चैत्र शुद्ध प्रतिपदेदिवशी नव्या हिंदू वर्षाची सुरूवात होते. या दिवसापासूनच देशभरात पुढील नऊ दिवस 'नवरात्र' साजरी केली जाते. पहिल्या दिवशी घट बसवून पुढील नऊ दिवस देवी कात्यायनीची पूजा करतात. प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. Chaitra Navratri 2019: चैत्र नवरात्र साजरी करण्यामागील महत्त्व काय?

कसा साजरा कराल नवरात्रीचा सण?

घट स्थापनेचा शुभ मुहूर्त 

चैत्र प्रतिपदा दिवशी सकाळी 9.57 नंतरचा मुहूर्त घट स्थापनेसाठी शुभ आहे. मात्र या दिवशी दुपारी 12.06 ते 12.54  या काळातील मुहूर्त अभिजीत मुहूर्त आहे. त्यामुळे या वेळेत घटस्थापना करणं अधिक फायदेशीर आहे.

घट स्थापनेचा शुभ मुहूर्त - दुपारी 12.06  ते 12.54

चैत्र नवरात्रीत प्रतिपदेला शैलपुत्री, द्वितीयेला ब्रह्मचारिणी , तृतीयेला चंद्रघंटा , चतुर्थीला कुष्मांडा, पंचमीला स्कंदमाता, षष्ठीला कात्यायिनी, सप्तमीला कालरात्री, अष्टमीला महागौरी व नवमीला सिद्धिदात्री या देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते.