
Buddha Purnima 2023 Wishes In Marathi: बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बौद्ध यांचा जन्म आणि निर्वाण दिन्ही वैशाख पौर्णिमेदिवशीच झालं असल्याने या दिवसाचं विशेष महत्त्व आहे. यंदा बुद्धपौर्णिमा 5 मे रोजी आहे. बुद्ध पौर्णिमा हा दिवस भगवान गौतम बुद्ध यांची जयंती साजरी म्हणून साजरी केली जाते, भगवान गौतम बुद्ध यांना बौद्ध धर्माचे संस्थापक मानले जाते. जगभरात बुद्ध पौर्णिमा हा सण देशातील आणि जगभरातील बौद्धांद्वारे साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा प्रसंग आहे, ज्याला "बुद्ध जयंती" असेही म्हणतात. या वर्षी गौतम बुद्धांची २५८५ वी जयंती आहे. बुद्धपौर्णिमा या दिवसाचं औचित्य साधून तुमच्या प्रियजणांना, नातेवाईकांना, मित्रमंडळींना गौतम बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी लेटेस्टली मराठी कडून तयार करण्यात आलेली ही मराठमोळी ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्र, मेसेजेस,Wishes, HD Images शेअर करायला विसरू नका. सोशल मीडीयामध्ये Facebook Messages, WhatsApp Status, GIFs द्वारा शुभेच्छा संदेश तुम्ही देऊ शकता. Buddha Purnima Quotes in Marathi: बुद्ध पौर्णिमानिमित्त गौतम बुद्ध यांचे 'हे' सकारात्मक विचार WhatsApp Messages, Images द्वारा शेअर करून साजरा करा खास दिवस!
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश






वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान गौतम बुद्धांना दिव्य ज्ञानप्राप्ती झाली. त्याला दिव्य ज्ञान, बुधत्त्व किंवा निर्वाण असेही म्हटले जाते. ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर सामान्य सिद्धार्थ गौतम यांची ओळख ‘बुद्ध’ अशी झाली. या खास प्रसंगी तुम्ही वर दिलेले शुभेच्छा संदेश पाठवून बुद्धपौर्णिमेचा दिवस आणखी खास बनवू शकता.