High Court On Use Of Loudspeakers: गणेशोत्सवाप्रमाणेच ईदसाठीही होणारा लाऊडस्पीकरचा वापर हानीकारक: मुंबई उच्च न्यायालय

परवानगी असलेल्या ध्वनीपातळीपेक्षा अधिक प्रमाणावर वापरले जाणारे लाऊडस्पीकर जर गणेशोत्सव (Loudspeakers Ganesh Festival) काळात ध्वनीप्रदुषण करत असतील आणि आरोग्यासाठी हानीकारक असतील, तर ते ईद ए मिलाद उन नाबी ( Eid-e-Milad-un-Nabi Processions) मध्येही तितकेच हानिकारक आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) नोंदवले आहे.

Bombay High Court | (Photo Credits: ANI)

परवानगी असलेल्या ध्वनीपातळीपेक्षा अधिक प्रमाणावर वापरले जाणारे लाऊडस्पीकर जर गणेशोत्सव (Loudspeakers Ganesh Festival) काळात ध्वनीप्रदुषण करत असतील आणि आरोग्यासाठी हानीकारक असतील, तर ते ईद ए मिलाद उन नाबी ( Eid-e-Milad-un-Nabi Processions) मध्येही तितकेच हानिकारक आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने () नोंदवले आहे. मुख्य न्यायमूर्ती डीके उपाध्याय आणि न्यायाधीश अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर उत्सवादरम्यान मिरवणूकांतील, डीजे, डान्स आणि लेजर लाईटचा वापर यांवर बंदी किंवा प्रतिबंध लावावेत या मागणीसाठी दाखल झालेल्या जनहीत याचिकेवर (PILs) वर सुनावणी झाली. या वेळी कोर्टाने हे मत नोंदवले.

जनहीत याचिकेमध्ये खुलासा करण्यात आला की, कुरान आणि हदीस (पवित्र पुस्तके) यांमध्ये उत्साह साजरा करताना डीजे सिस्टम आणि लेजर लाईट यांचा कोठेही उल्लेख करण्यात आला नाही. खंडपीठाने गणेशोत्सवापूर्वी गेल्या महिन्यात सणांच्या दरम्यान दिलेल्या आदेशाचा संदर्भ दिला ज्यामध्ये ध्वनी प्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) नियम, 2000 अंतर्गत निर्दिष्ट केलेल्या परवानगीच्या मर्यादेपेक्षा जास्त आवाज उत्सर्जित करणाऱ्या ध्वनी प्रणाली आणि लाऊडस्पीकरच्या वापरावर बंदी घालण्यावर भर दिला होता.

लाऊडस्पीकरविरोधात जनहित याचिका

जनहित याचिका कर्त्यांचे वकील ओवेस पेचकर यांनी कोर्टाला आपल्या आगोदरच्या आदेशामध्ये ईदचाही समावेश करावा अशी मागणी केली होती. त्यावर खंडपीठाने सांगितले की, त्या आदेशात सार्वजनिक सण असा उल्लेख आहे. त्यामुळे आणखी कोणत्या सणांचा वेगळा उल्लेख करणे आवश्यक नाही. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, न्यायालयाने याचिका निकाली काढताना म्हटले की, जर आगोदरच्या आदेशामध्ये डीजे, लेजर लाईट्स यांचा वापर गणेश चतुर्थीसाठी हानिकारक असेल तर ते ईदसाठी देखील हानिकारक आहे.

लेझर लाईट वापरावर बंदीची मागणी

दरम्यान, लेझर लाइट्सच्या वापरावर खंडपीठाने याचिकाकर्त्यांना अशा दिव्यांचा मानवांवर होणाऱ्या हानिकारक परिणामांबाबत वैज्ञानिक पुरावे दाखवण्यास सांगितले. खंडपीठाने म्हटले आहे की अशा याचिका दाखल करण्यापूर्वी योग्य संशोधन केले पाहिजे. तुम्ही तुमचे संशोधन का केले नाही? त्यामुळे मानवाला हानी होते हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाल्याशिवाय आम्ही अशा मुद्द्याचा निर्णय कसा घेणार? अशी विचारणाही खंडपीठाने याचिकाकर्त्यांकडे केली. याचिकाकरत्यांनी न्यायालयांना प्रभावी निर्देश देण्यासाठी ठोस आणि अचूक माहितीची पूर्तता करायला हवी. त्यामुळे जनहित याचिका दाखल करण्यापूर्वी, तुम्ही मूलभूत संशोधन केले पाहिजे. तुम्ही न्यायालयाला प्रभावी दिशा देण्यासाठी मदत केली पाहिजे. आम्ही तज्ञ नाही. आम्हाला लेसरचा 'एल' माहित नाही, असेही कोर्टाने म्हटले. दरम्यान, उत्सव आणि मिरवणूकांमध्ये होणारा लेसर प्रकाशांचा मारा हा सध्या चर्चेचा विषय आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif